गुपित उलगडलं, उमेश-प्रियाची अशीही गुड न्यूज!

दादरच्या प्रभादेवी परिसरातही 'दादा, मी प्रेग्नन्ट आहे.' असं होर्डिंगही लावण्यात आलं होतं. अनेकांनी याबाबत तर्कवितर्क काढले आणि अखेर हे गुपित उलगडलं.

News18 Lokmat | Updated On: Dec 3, 2018 10:26 AM IST

गुपित उलगडलं, उमेश-प्रियाची अशीही गुड न्यूज!

मुंबई, 3 डिसेंबर : काही दिवसांपूर्वी प्रिया बापटनं सोशल मीडियावर एक गुड न्युज आहे अशी पोस्ट शेअर केली होती. त्यावेळी सगळ्यांना वाटलेलं उमेश-प्रियाला बाळ होणार. अनेकांनी त्यांना शुभेच्छाही दिल्या होत्या.

त्यावेळी प्रिया आणि उमेशला फोन करण्याचा प्रयत्न केलेला. तो फोन लागला नाही. मुद्दामच ते दोघं फोनपासून दूर राहिले होते.

दादरच्या प्रभादेवी परिसरातही 'दादा, मी प्रेग्नन्ट आहे.' असं होर्डिंगही लावण्यात आलं होतं. अनेकांनी याबाबत तर्कवितर्क काढले आणि अखेर हे गुपित उलगडलं.

प्रियाची फेसबुक पोस्ट आणि ते होर्डिंग यांचं एकमेकांशी कनेक्शन होतं. एक नवंकोरं नाटक  'दादा,एक गुड न्युज आहे'चं  पोस्टर सोशल नेटवर्किंग साईटवर रिलीज करण्यात आलं. या नाटकात उमेश कामत आणि हृता दुर्गुळे यांच्या भूमिका आहेत. प्रिया बापट नाटकाची निर्मिती करतेय. अद्वैत दादरकर दिग्दर्शन करतोय.

हे नाटक आहे बहीण-भावाच्या नात्यावर. उमेश या नाटकामध्ये एक साधं नॉर्मल आयुष्य जगणारा, खंबीर, कर्तव्याची जाण असलेला आणि बहिणीवर विशेष प्रेम असणाऱ्या भावाची भूमिका निभावतोय. हृता ही कॉलेजला जाणारी, आयुष्य एन्जॉय करणारी आणि भावावर जीवापाड प्रेम करणारी अशी बहीण साकारत आहे.

Loading...

हृताचं हे रंगभूमीवरील पहिलंच व्यासायिक नाटक आहे. नेपथ्य प्रदीप मुळ्ये तर संगीताची धुरा ओंकार पाटील यांनी सांभाळली असून, आरती मोरे, ऋषी मनोहर आणि जयंत घाटे यांच्याही नाटकात भूमिका आहेत.

हल्ली नाटक-सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी वेगवेगळे फंडे वापरले जातात.त्यातही आता खूप वैविध्य आलंय. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकताही जास्त वाढते.


Photos : लग्नानंतर प्रियांका-निकचं हाॅट फोटोशूट व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2018 10:26 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...