मुंबई, 21 फेब्रुवारी : बॉलिवूड सेलिब्रेटी फोटोग्राफर डब्बू रत्नानीने काढलेला अभिनेत्री कियारा अडवाणीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. डब्बू रत्नानीच्या कँलेंडरचं नेहमीप्रमाणेच याहीवर्षी लॉन्च झालं. याहीवर्षी नेहमीप्रमाणे त्यातील अनेक बोल्ड फोटो चर्चेचं कारण ठरले आहेत. पण यात सर्वाधिक चर्चेत राहिली ती अभिनेत्री कियारा अडवाणी. डब्बू रत्नानी कॅलेंडरसाठी कियारानं टॉपलेस फोटोशूट केलं होतं. ज्यात तिनं एका पानानं आपलं शरीर झाकलं होतं. हे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर त्यावर अनेक मीम्स व्हायरल झाले ज्यात युजर्सनी कियाराला कपडे घातलेले दिसले. कियाराच्या या फोटोशूट संदर्भात आणखी एक माहिती समोर येत आहे.
View this post on InstagramA leaf out of #DabbooRatnaniCalendar! @dabbooratnani @manishadratnani
कियारा अडवाणीचा TOPLESS फोटो खूप व्हायरल झाला. डब्बू रत्नानीवर इंटरनॅशनल फोटोग्राफर मॅरी बार्शनं त्याची संकल्पना चोरल्याचा आरोप देखील केला. आधीच कियाराच्या टॉपलेस फोटोमुळे डब्बू रत्नानीला ट्रोल व्हावं लागलं होतं त्यानंतर आता या नव्या वादाला तोंड फुटलं आहे.आता या फोटोसंदर्भातील आणखी एक फोटो समोर येत आहे.
'कबीर सिंग' फेम अभिनेत्री कियारा डब्बू रत्नानीच्या फोटोशूटसाठी टॉपलेस झाल्याच्या सर्वत्र होत्या. मात्र सध्या सोशल मीडियावर समोर आलेल्या फोटोनुसार कॅमेऱ्याची ट्रीक वापरत हा फोटो काढल्याचा दावा केला जात आहे. डब्बू रत्नानीच्या शूटदरम्यानचा हा कियाराचा फोटो असल्याचं बोललं जात आहे. ज्यात कियाराने स्कीन कलरचे कपडे घातल्याचं कॅमेरा स्क्रीनवर दिसत आहे. त्यामुळे मोठ्या पानामागे उभी राहिलेल्या कियाराचा फोटो अशाप्रकारे क्लिक करण्यात आला की फोटो पाहणाऱ्याला असं वाटेल की ती टॉपलेस आहे, असा दावा काही युजर्सनी केला आहे.
Hammayya case closed #KiaraAdvani pic.twitter.com/9HS50h6MFf
— Mallineni 🙏🙏 (@KrackHit) February 20, 2020
अन्य बातम्या
VIDEO : 'मला मरायचं आहे...', मानसिक छळाला कंटाळून 9 वर्षाच्या मुलाची आईकडे मागणी
2800 फुट उंचावरून या मुलीने केलं असं काही, VIDEO पाहून हृदयाचे ठोके नक्की वाढतील
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.