Home /News /entertainment /

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये 'हे' असणार नवे नट्टू काका! पाहा व्हायरल फोटो

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये 'हे' असणार नवे नट्टू काका! पाहा व्हायरल फोटो

घनश्याम नायक हे या मालिकेतील सर्वात महत्त्वाचं आणि लोकप्रिय पात्रांपैकी एक नट्टू काका हे पात्र साकारत होते. त्यांनी आपल्या उत्तम अभिनयाच्या बळावर ही भूमिका अतिशय लोकप्रिय केली होती.

मुंबई, 6 नोव्हेंबर : घराघरात पोहोचलेल्या टीव्हीच्या (TV) छोट्या पडद्यानं (Small Screen) मनोरंजनसृष्टीत क्रांती घडवली आहे. आज हिंदी चित्रपटसृष्टी म्हणजे बॉलिवूड (Bollywood) इतकीच ही छोट्या पडद्याची सृष्टी बहरली आहे. अनेक वाहिन्या, त्यावरील अनेक मालिका आणि त्यातील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. टीव्हीवरील अनेक मालिका (Serial) तर वर्षोनुवर्षे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. यातीलच एक मालिका आहे 'तारक मेहता का उल्टा चश्मा'. गेली जवळपास 13 वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. त्या काळात या मालिकेतील अनेक कलाकार बदलले; पण कथानक कायम राहिलं आहे. 2008 पासून सुरू झालेली ही मालिका टीआरपी चार्टमध्ये (TRP Chart) आपलं स्थान टॉप 5 मध्ये कायम राखून आहे. झी न्यूजनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. अनेक दीर्घकाळ चाललेल्या मालिकांमध्ये वेगवेगळ्या कारणांनी कलाकार बदलले जातात. काही वेळा कलाकारांचे निधन होते, अशावेळी त्या भूमिकेसाठी नवीन कलाकाराची निवड करावी लागते. तारक मेहता मालिकेबाबतही सध्या अशी वेळ आले आहे. कारण या मालिकेतील एक लोकप्रिय पात्र नट्टू काकांची (Nattu Kaka) भूमिका साकारणारे अभिनेते घनश्याम नायक (Ghanshyam Naik) यांचं अलीकडेच निधन झालं. त्यामुळे आता ही भूमिका कोण साकारणार असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. आता या प्रश्नाचे उत्तर मिळणार असून लवकरच एक प्रसिद्ध अभिनेता ही भूमिका साकारणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. विकीची एक्स गर्लफ्रेंड सुंदरतेत कतरिनाला देते मात, हॉलिवूडमध्ये केलंय काम घनश्याम नायक हे या मालिकेतील सर्वात महत्त्वाचं आणि लोकप्रिय पात्रांपैकी एक नट्टू काका हे पात्र साकारत होते. त्यांनी आपल्या उत्तम अभिनयाच्या बळावर ही भूमिका अतिशय लोकप्रिय केली होती. त्यामुळे नट्टू काका हे पात्र प्रेक्षकांचे अत्यंत आवडते पात्र झाले होते. घनश्याम नायक यांच्या निधनानंतर आता त्यांच्या इतकी ताकदीने ही भूमिका कोण साकारणार असा प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण झाला होता. आता मालिकेच्या निर्मात्यांनी नट्टू काकांच्या भूमिकेसाठी एका अभिनेत्याची निवड केली असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर येऊ लागल्या आहेत.
View this post on Instagram

A post shared by | | ™ (@jehtho)

सोशल मीडियावर 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेबाबत अपडेट्स देणाऱ्या पेजने नवीन नट्टू काकांचा फोटो शेअर केला आहे. जेठालालच्या दुकानात ज्या खुर्चीवर घनश्याम नायक बसायचे त्याच खुर्चीवर हा नवीन अभिनेता बसलेला दिसतो. मात्र ,याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे हे खरेच नवीन नट्टू काका आहेत की अफवा आहे, याची चर्चा सुरू झाली आहे. महाराणी ताराराणींची महती सांगणारा जगातील पहिला मराठी हॉलिवूड चित्रपट ; मराठीसहीत इंग्रजी भाषेत होणार चित्रित आत्तापर्यंत तारक मेहता या मालिकेतील बहुतेक कलाकार अनेक कारणांनी बदलले आहेत; पण काही कलाकार पहिल्यापासुन आजही कायम आहेत. यात जेठालाल ही मध्यवर्ती आणि लोकप्रिय भूमिका साकारणारे दिलीप जोशी, भिडे ही भूमिका साकारणारे मंदार चांदवडकर आदींचा समावेश आहे.
First published:

Tags: Tarak mehta ka ooltah chashmah, Tv actors

पुढील बातम्या