Bigg Boss Marathi 2 : घरात होणार 'या' नव्या दमाच्या तरुण अभिनेत्याची वाईल्ड कार्ड एंट्री !

Bigg Boss Marathi 2 : घरात होणार 'या' नव्या दमाच्या तरुण अभिनेत्याची वाईल्ड कार्ड एंट्री !

या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कुणी सदस्य बाहेर पडण्याऐवजी एक नवा मेंबर बिग बॉसच्या घरात दाखल होणार आहे.

  • Share this:

मुंबई 20 जुलै : बिग बॉस (Bigg Boss Marathi 2) मालिकेत दररोज काही ना काही भांडणं, वादावादी, हेवेदावे सुरू आहेत. बिग बॉसच्या घरातले तंटे कमी होण्याचं काही नाव घेत नाहीत. त्यातच आता प्रत्येक आठवड्यात कोण बाहेर पडणार याची उत्सुकता आहे. पण बाहेर पडण्याऐवजी या आठवड्यात एक नवा मेंबर बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे. बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये यापूर्वी घराबाहेर जाण्याची इच्छा व्यक्त करून बाहेर पडलेली स्पर्धक शिवानी सुर्वेची पुन्हा घरामध्ये एण्ट्री झाली. आता नवा येणारा सदस्य म्हणजे पुन्हा नवा डाव सुरू होणार.

बिग बॉसच्या घरात आरोह वेलणकर या तरुण अभिनेत्याला प्रवेश देण्यात येणार आहे. वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे आरोह बिग बॉसच्या घरात जाणार आहे. बिग बॉस मराठी सिझन 2 चा वीकएंड त्यामुळे चांगलाच रंगण्याची चिन्हं आहेत.

आठवड्यात कोण कसं वागलं, कसं खेळलं हे बिग बॉस महेश मांजरेकर सांगतीलच पण आठवड्याचा स्टार परफॉर्मरसुद्धा जाहीर होईल. तेव्हाच बिग बॉस या नव्या मेंबरची घोषणा करतील.

PHOTO : गर्ल्स गँगसोबत मलायका एंजॉय करतेय मालदीव व्हेकेशन, पाहा तिचे हॉट फोटो

आरोह वेलणकर हा 'रेगे' चित्रपटामुळे लोकप्रिय झाला. लहान वयातच तो या इंडस्ट्रीत आला. रेगेमध्ये दमदार भूमिका सादर करून मनं जिंकली.

आरोह हा मूळचा पुण्याचा आहे. कॉलेज लेव्हलच्या एकांकिका स्पर्धा त्यानं गाजवल्या होत्या. तिथूनच त्याला मराठी नाटक आणि चित्रपटात संधी मिळाली.आरोहने घंटा या चित्रपटामध्ये देखील काम केले आहे. आता बिग बॉसच्या निमित्ताने तो छोट्या पडद्यावर येतोय आणि थेट रिअॅलिटी शोमध्ये भाग घेत आहे.

पाहा  - VIDEO प्रियांका चोप्राच्या या Birthday आउटफिट्सची किंमत ऐकून व्हाल थक्क

बिग बॉसच्या घरात प्रवेश करणाऱ्या या नव्या सदस्याविषयी घरातल्यांना अर्थातच कल्पना नाही. आता त्यांची प्रतिक्रिया काय असेल, नव्या सदस्याचं ते स्वागत करतील का? आरोह कोणत्या ग्रुपच्या बाजूने खेळेल? की तो वैयक्तिक गेम खेळेल? हे बघणं रंजक असणार आहे.

VIDEO : 'सहज गर्दी बघायला गेलो आणि भावाचाच मृत्यू झाल्याचं कळलं'

First published: July 20, 2019, 6:58 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading