मुंबई, 23 नोव्हेंबर- छोट्या पडद्यावर 23 नोव्हेंबर पासून नवी मालिका अबोली रसिकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेच्या शीर्षकाप्रमाणेच ही गोष्ट आहे अबोली नावाच्या मुलीच्या संघर्षाची. अभिनेत्री गौरी कुलकर्णी अबोली ही व्यक्तिरेखा साकारणार असून गौरी ही भूमिका साकारण्यासाठी खुपच उत्सुक आहे.या मालिकेतील मराठी मनोरंजन विश्वातील विविध चेहरे दिसणार आहेत. सचित पाटील, प्रतिक्षा लोणकर, मौसमी तोंडवळकर, शर्मिष्ठा राऊत, संदेश जाधव, अपर्णा अपराजित, अंगद म्हस्कर, दीप्ती लेले अशी दमदार कलाकारांची फौज या मालिकेत आहे. त्यामुळे प्रेक्षकांनाही ही मालिका पहाताना भरभरुन आनंद मिळेल याची खात्री आहे. या मालिकेत आणखी एक लोकप्रिय चेहरा दिसणार आहे तो म्हणजे अभिनेता 'अतुल आगलावे' ( aatul aglave) याचा. 'अबोली' मालिकेतील 'गुंजनराव' त्याच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे.
नुकताच एक प्रोमो प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये अतुल त्याच्या या मालिकेतील व्यक्तीरेखेबद्दल सांगतांना दिसत आहे. त्याचा कलरफुल लुक पाहून त्याची रोल काहीतरी वेगळा असल्याची कल्पना येतेच. या मालिकेतील भूमिकेविषयी अतुल सांगताना म्हणाला की, तुम्ही मला मोलकरीण बाई या मालिकेचा बघितला असाल तर तुम्ही मला प्रचंड प्रेम केलं. आता स्टार प्रवाहच्या नवीन मालिकेत मी तुमच्या समोर एक नवीन रंगात नव्या ढंगात असा एकंदरीत रंगीबिरंगी अवतारात दिसणार आहे. थोडक्यात सांगायचे तर मी तुम्हाला आत्तापर्यंत मी केलेले भूमिकांपेक्षा वेगळं काहीतरी करताना दिसणार आहे. या मालिकेत माझी भाषा ही पूर्णपणे वेगळी असणार आहे. मला असं काहीतरी सतत वेगवेगळे करायला फार आवडतं. कारण आधी केलेली भूमिका तशाच प्रकारची भूमिका पुन्हा करण्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याची चॅलेंजिंग असतं. अतुलच्या या भूमिकेमुळे मालिकेत कोल्हापुरी भाषेचा बाज पाहाण्यास मिळणार आहे.
वाचा : Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरात भरणार मासळी बाजार! विकास जयला विकणार सारंगे
आता मी या मालिकेत जी भाषा बोलतो ती मी कधी बोललो नाही. यामध्ये मी कोल्हापुरी भाषेत बोलणार आहे. मी या मालिकेत नकारात्मक भूमिका साकराताना दिसत आहे. अर्थात अभिनेता म्हणून मी हे निगेटिव्ह व पॉझिटिव्ह मानत नाही, कारण ती प्रवृत्ती असते. या भूमिकेत मला पाहून तुम्हाला माझा राग येईल तर कधी हासू देखील येईल. आता प्रेक्षक देखील त्याला या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
View this post on Instagram
या मालिकेत सचित पाटील इन्सपेक्टर अंकुशी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. सचितला याआधी ग्लॅमरस रुपात आपण पाहिलं आहे. त्यामुळे अबोली मालिकेतला त्याचा हा नवा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.