सैनिकांचा जीवनप्रवास उलगडणारा पहिलाच मराठी चित्रपट; पाहा 'स्पेशल' झलक

सैनिकांचा जीवनप्रवास उलगडणारा पहिलाच मराठी चित्रपट; पाहा 'स्पेशल' झलक

मराठी सिनेविश्वात बऱ्याच दिवसांनी सैनिकांच्या आयुष्यावर आधारित एक जबरदस्त अ‍ॅक्शन फिल्म येत आहे. स्पेशल (Special) असं या सिनेमाचं नाव आहे.

  • Share this:

मुंबई, 14 डिसेंबर: आपलं सैन्य दल हा आपला अभिमान आहे. लष्करी खात्याची कामगिरी नेहमीच वाखाणण्याजोगी असते. आजतागायत आपल्या सैनिकांनी देशासाठी दिलेले बलिदान आणि देशाच्या हितासाठी कायम केली. सैनिकांच्या जीवनप्रवासावर  आधारित आणि सैनिकांना समर्पित पहिली मराठी लष्करी अ‍ॅक्शन फिल्म आपल्या भेटीस येणार आहे. लेखक, दिग्दर्शक सचिन रामचंद्र आंबात लिखित, दिग्दर्शित 'स्पेशल' (Special) चित्रपटाचे पहिलं पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं.

'स्पेशल' या सिनेमातून समाजाला स्पेशल संदेश मिळणार आहे. याशिवाय बऱ्याचश्या गाजलेल्या गाण्यांची निर्मिती आणि दिग्दर्शनातही सचिन यांनी उत्तम समतोल राखला. त्यांच्या या 'स्पेशल' चित्रपटातून एक फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता सुयोग गोऱ्हे आणि अभिनेत्री पायल कबरे हे कलाकार पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे.  'शेंटिमेंटल', 'सातारचा सलमान', 'सिनियर सिटीझन', 'आम्ही बेफिकीर' यांसारख्या चित्रपटात मुख्य भूमिका साकरल्यानंतर स्पेशल या चित्रपटातून एक वेगळ्या धाटणीची भूमिका साकारणार आहे. तर पायल कबरेची या चित्रपटातील भूमिका चित्रपटाच्या नावाप्रमाणेच स्पेशल आहे. पायलने सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या अभिनय शाळेतून अभिनयाचे धडे घेतले आहेत. या चित्रपटातून पायल मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे आणि म्हणूनच तिच्यासाठी हा चित्रपट नक्कीच स्पेशल असणार आहे. या चित्रपटात सुयोग 'समर नाईक' आणि पायल 'भूमी राठोड' नामक पात्रे साकारणार आहेत. आणि ही दोन्ही पात्रे लष्करी अधिकाऱ्याच्या भूमिकेत  दिसणार आहेत.

चित्रपटाचा मुख्यबिंदू म्हणजे संगीत. एकंदरीत देशाच्या हिताचे एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी समर आणि भूमीची लढाई या संपूर्ण चित्रपटाच्या प्रवासात पाहायला मिळणार आहे. ही लढाई कशी स्पेशल असणार आहे हे 'स्पेशल' या चित्रपटातूनच कळेल. त्यामुळे साऱ्या रसिक प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणाऱ्या 'स्पेशल' चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 14, 2020, 6:22 PM IST

ताज्या बातम्या