मुंबई, 1 मार्च: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या स्वराज्याच्या लढ्यावर सध्या मराठी चित्रपटसृष्टीत आणि बॉलीवूड मध्ये बरेच चित्रपट तयार होत आहेत. तानाजी (Tanhaji ) चित्रपटाच्या यशानंतर आता आणखी काही ऐतिहासिक चित्रपटांची घोषणा करण्यात आली होती. त्यात मराठीतले (New Marathi movie) ‘फतेशिकस्त’, ’फर्जंद’, ’सरसेनापती हंबीरराव’, 'जंगजौहर' या आगामी चित्रपटांची घोषणा करण्यात आली आहे. आता 'जंगजौहर' या चित्रपटाबद्दलच एक मोठी बातमी समोर येत आहे. या चित्रपटाच्या मुहूर्तापासूनच हा चित्रपट कायमच चर्चेत राहिला आहे. आणि आता या चित्रपटाच नावं बदलून ‘पावनखिंड’ (Pawankhind Movie) असं करण्यात आलं आहे.
ए. ए. फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या 'जंगजौहर' या चित्रपटाची निर्मिती आलमंड्स क्रिएशन्सच्या बॅनरखाली निर्माते अजय-अनिरुद्ध यांनी केली आहे. 'फर्जंद' आणि 'फत्तेशिकस्त' या चित्रपटांना मिळालेलं यश आणि प्रेक्षकांच्या उदंड प्रतिसादानंतर दिग्पाल लांजेकरनं 'जंगजौहर' चित्रपटाच्या रूपात 'शिवराज अष्टका'तील तिसरे पुष्प शिवचरणी अर्पण करण्याचा विडा उचलला. चित्रपटरूपी तिसरे पुष्प रसिक दरबारी सादर करायला काही अवधी असतानाच या चित्रपटाशी निगडीत एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. 'जंगजौहर' हे या चित्रपटाचं शीर्षक बदलून आता 'पावनखिंड' करण्यात आलं आहे. 'जंगजौहर' या चित्रपटासाठीही 'पावनखिंड' याच शीर्षकासाठी प्रयत्न सुरू होते, पण एका अन्य निर्मात्यांनी या टायटलची नोंदणी आधीच करून ठेवली होती. त्यामुळे चित्रपटाचे शीर्षक 'जंगजौहर' ठेवण्यात आलं होतं. मात्र अलीकडच्या काळात अशा काही घडामोडी घडल्या की, ज्या निर्मात्यांच्या नावावर हे टायटल होतं त्यांनी 'जंगजौहर'ला 'पावनखिंड' हे शीर्षक वापरण्याची परवानगी दिली. त्यामुळे आता बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्यांचा पराक्रम ‘पावनखिंड’ या नावानेच रुपेरी पडद्यावर आपल्याला पहायला मिळेल.
पावनखिंडीतील बाजीप्रभू देशपांडे यांचा अंगावर रोमांच उभे करणारा पराक्रम हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामधील एक सुवर्ण अध्याय आहे. बाजीप्रपू देशपांडे आणि त्यांच्या मावळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप विशाळगडावर पोहचेपर्यंत सिद्धी जोहरला कसं थोपवून धरलं त्यावरच या चित्रपटाची कथा आधारीत आहे. या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला असून 10 जूनला हा चित्रपट प्रदर्शित होईल.
अवश्य वाचा - सुनील ग्रोवरवर का आली रस्त्यावर ज्यूस विकण्याची वेळ! VIDEO VIRAL
या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, समीर धर्माधिकारी आणि अंकित मोहन यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.सिनेमॅटोग्राफर अमोल गोळेने छायांकन कलं असून, संगीत-पार्श्वसंगीत देवदत्त मनिषा बाजीने दिल आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chhatrapati shivaji maharaj, Marathi cinema, Upcoming movie