S M L

बाॅलिवूड स्टार घेऊन येतोय मराठी 'ट्रकभर स्वप्न'

या महिन्याच्या 24 तारखेला 'ट्रकभर स्वप्न' सिनेमा रिलीज होतोय. एका सर्वसामान्य कुटुंबाच्या स्वप्नांचा प्रवास म्हणजेच हा सिनेमा.

Updated On: Aug 10, 2018 12:12 PM IST

बाॅलिवूड स्टार घेऊन येतोय मराठी 'ट्रकभर स्वप्न'

मुंबई, 10 आॅगस्ट : या महिन्याच्या 24 तारखेला 'ट्रकभर स्वप्न' सिनेमा रिलीज होतोय.  एका सर्वसामान्य कुटुंबाच्या स्वप्नांचा प्रवास म्हणजेच हा सिनेमा. या प्रवासाला दिशा देण्याचं काम म्हणजेच सिनेमा दिग्दर्शित करण्याचं काम केलंय प्रमोद पवार यांनी. मकरंद देशपांडे, क्रांती रेडकर, मनोज जोशी अशा कलाकारांच्या भूमिका सिनेमात आहेत. महत्त्वाचं म्हणजे या मराठी सिनेमातून एक बाॅलिवूडचा चेहरा मराठीत पदार्पण करतोय.

हा आहे हिंदीतला एक भारदस्त अभिनेता. अर्थातच, मुकेश ऋषी. उंच, धिप्पाड, भारदस्त व्यक्तिमत्व आणि पहाडी आवाज लाभलेल्या मुकेश यांनी आजवर कधी खलनायक, तर कधी पोलीस इन्स्पेक्टर, कधी गँगस्टर, तर कधी अतिरेकी अशा विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. ‘सरफरोश’, ‘घातक’, ‘घायल’, ‘कोई मिल गया’ अशा एकापेक्षा एक हिट झालेल्या सिनेमांमधील मुकेश यांच्या व्यक्तिरेखा खूप गाजल्या आहेत. मुकेश यांची पावलं आता मराठीच्या दिशेनं वळली आहेत. ‘ट्रकभर स्वप्न’ या बहुचर्चित सिनेमात मुकेश यांनी महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारली आहे.हेही वाचा

विश्वरूपम 2 : कमल हासन आलेत शांतीचा संदेश द्यायला

कसा आहे सुबोधचा विक्रांत सरंजामे?

Loading...

एकता कपूर करतेय बाॅलिवूडच्या 'या' लोकप्रिय अभिनेत्रीचा कमबॅक

मुकेश यांनी आजवर तेलुगू, मल्याळम, पंजाबी, तमीळ अशा विविध प्रादेशिक भाषांमधील सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. मराठीत काम करण्याचा एक वेगळाच अनुभव असल्याचं सांगत आपल्या व्यक्तिरेखेबाबत मुकेश म्हणाले की, ‘ट्रकभर स्वप्न’ची आॅफर खरं तर मी यातील व्यक्तिरेखेच्या प्रेमाखातर स्वीकारली. आजवर मी विविध भाषांच्या सिनेमांमध्ये नाना तऱ्हेच्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत, पण या सिनेमातील व्यक्तिरेखा खूप वेगळी आहे. हा लोकांना पैसे देतो, पण त्या बदल्यात अपेक्षाही करतो. या निमित्ताने मराठी भाषेचा स्वाद चाखता आला.'

‘ट्रकभर स्वप्न’मधील व्यक्तिरेखेप्रमाणेच मुकेश या सिनेमाचे दिग्दर्शक आणि पूर्ण टीमच्याही प्रेमात आहेत. ते म्हणाले की, सिनेमाचे दिग्दर्शक प्रमोद पवार हे मराठीतील नामवंत अभिनेते असल्याचं जेव्हा मला समजलं, तेव्हा त्यांच्याबद्दल माझ्या मनातील आदर वाढला. अतिशय खेळकर वातावरणात या सिनेमाचं चित्रीकरण कधी पूर्ण झालं ते समजलंच नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 10, 2018 12:08 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close