पाच वर्षांनी मधुरा वेलणकरनं घेतलाय 'एक निर्णय'

पाच वर्षांनी मधुरा वेलणकरनं घेतलाय 'एक निर्णय'

श्रीरंग देशमुखचं पहिलंच दिग्दर्शन असलेला 'एक निर्णय स्वत:चा स्वत:साठी'मध्ये मधुराची भूमिका आहे.

  • Share this:

मुंबई, 5 नोव्हेंबर : अभिनेत्री मधुरा वेलणकरचा 'हापुस' सिनेमा खूपच गाजला होता. शिवाय तिची मिस्टर अँड मिसेस आणि हा शेखर खोसला कोण आहे ही नाटकंही हिट होती. मधुरा आता येतेय मोठ्या पडद्यावर.

श्रीरंग देशमुखचं पहिलंच दिग्दर्शन असलेला 'एक निर्णय स्वत:चा स्वत:साठी'मध्ये मधुराची भूमिका आहे. सिनेमाबद्दल बोलताना मधुरा म्हणाली, 'भावभावनांवर हा सिनेमा आहे. माझ्याच वयाची भूमिका आहे. यात मी डाॅक्टर आहे.'

मधुरा व्यक्तिरेखेबद्दल सांगताना म्हणाली, 'या डाॅक्टरनं स्वत:ला कामाला पूर्ण वाहून दिलंय. ती जणू डाॅक्टर म्हणून जन्माला आलीय. तिला वैयक्तिक आयुष्यापेक्षा स्वत:च्या कामाला महत्त्व द्यायला आवडतं. तिला तिच्या वैयक्तिक आयुष्यात एक निर्णय घ्यायची वेळ येते. तेव्हा अनेकांच्या विरोधाला न जुमानता स्वत:साठी ती निर्णय घेते.' मधुरानं  स्वत:च्या भूमिकेबद्दल सांगतात त्यामागचा सस्पेन्सही कायम ठेवलाय.

व्यक्तिरेखेबद्दल बोलताना ती म्हणाली, ' जरी ती डाॅक्टर असली, तरी ती स्त्री आहे. मनात एक सल आहे. पोकळी आहे.'

या सिनेमात तिच्याबरोबर सुबोध भावेही आहे.विक्रम गोखले, सुहास जोशी, प्रदीप वेलणकर, मंगल केंकरे, सीमा देशमुख यांच्याही भूमिका आहेत.

मधुरानं नाटक, सिनेमा आणि मालिका सगळ्या माध्यमात काम केलंय. मग तिचं आवडतं माध्यम कुठलं? यावर मधुरा सांगते, ' नाटक की सिनेमा हे सांगणं कठीण आहे. मालिकांमध्ये मी फार रमत नाही.'

सिनेमात परतण्याच्या मधुराच्या या 'निर्णया'चं मात्र सगळीकडे स्वागतच होतंय.

रणवीरच्या घरी सुरू झाला हळदीचा कार्यक्रम, Photos व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2018 04:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading