S M L

'हॅम्लेट'मधल्या सुमित राघवनचा लूक पाहिलात का?

शेक्सपीअरचं गाजलेलं नाटक 'हॅम्लेट' आता मराठी रंगभूमीवर दाखल होणारे.त्यात मुख्य भूमिकेत आहे सुमित राघवन. सुमितचा या नाटकातला लूक बाहेर आलाय.

Sonali Deshpande | Updated On: Apr 17, 2018 04:38 PM IST

'हॅम्लेट'मधल्या सुमित राघवनचा लूक पाहिलात का?

17 एप्रिल : शेक्सपीअरचं गाजलेलं नाटक 'हॅम्लेट' आता मराठी रंगभूमीवर दाखल होणारे.त्यात मुख्य भूमिकेत आहे सुमित राघवन. सुमितचा या नाटकातला लूक बाहेर आलाय.महेश एलकुंचवारांच्या वाडा नाट्यत्रयीच्या यशस्वी प्रयोगांनंतर दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी हे शिवधनुष्य उचलण्याचा निर्णय घेतलाय.

या नाटकात अभिनेता सुमीत राघवन हा 'हॅम्लेट'ची मध्यवर्ती भूमिका साकारणार असून त्याच्याशिवाय समीर धर्माधिकारी, मुग्धा गोडबोले, मनवा नाईक असे तब्बल 18 कलावंत या नाटकात काम करताना आपल्याला दिसतील.या नाटकाची निर्मिती झी मराठी करणार असून या नाटकाद्वारे सिनेमांप्रमाणेच नाट्यनिर्मितीतही झी पदार्पण करतेय. हे नाटक भव्य दिव्य रूपात मराठी रंगभूमीवर सादर करण्याचा निश्चय या सगळ्यांनी मिळून केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 17, 2018 04:38 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close