कोण आहे नवं इंटरनेट सेन्सेशन बाबा जॅक्सन? 'स्ट्रीट डान्सर'च्या टीमलाही दिला झटका

कोण आहे नवं इंटरनेट सेन्सेशन बाबा जॅक्सन? 'स्ट्रीट डान्सर'च्या टीमलाही दिला झटका

काही दिवसांपूर्वी या युवकाच्या tik tok वरील एका व्हिडिओनं ट्विटरवर चांगला धुमाकूळ घातला होता.

  • Share this:

मुंबई, 25 जानेवारी : सोशल मीडियावर (social media) प्रसिद्धी मिळवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. एका व्हिडिओमुळे (video) अनेकांचं आयुष्य बदलल्याचा घटना ऐकत असतो. त्यातलं नुकतच उदाहरण म्हणजे राणू मंडल (ranu mandal) यांचं. रेल्वे स्थानकावर गाणाऱ्या राणू मंडल सोशल मीडियावर व्हायरल (viral) झालेलेल्या एका व्हिडिओमुळे एका रात्रीमध्ये प्रसिद्ध झाल्या आणि हिमेश रेशमिया यांनी त्यांना गाण्यासाठी ऑफर दिली. आता आणखी एका मुलाचा टीकटॉक (tik tok video) व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. या मुलाचा डान्स (dance) पाहून नेटकऱ्यांनी तुफान लाईक्सचा पाऊस पाडला. हा युवकाच्या व्हिडिओची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली होती. त्यानंतर रेमो डिसूझांपासून (Remo D'souza) ते हृतिक रोशनपर्यंत सगळेजण या युवकाचा पत्ता शोधत होते.

कोण आहे हा मुलगा ज्याचा डान्स पाहून बॉलिवूडचे मोठमोठे सेलिब्रेटी सुध्दा थक्क झाले. कुणी याला मायकल जॅक्सनचा नवा अवतार म्हटलं तर कुणी याला बाबा जॅक्सन म्हटलं. पण आता सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा सुपर डान्सर कोण याचा खुलासा झाला आहे. हा आहे राजस्थानच्या जोधपूरमध्ये राहणारा युवराज. केवळ 5-6 महिन्यात त्याने डान्समध्ये एक वेगळंच शिखर गाठलंय. सध्या तो इंटरनेट सेन्सेशन म्हणून ओळखला जातोय. टिकटॉकवरही बाबा जॅक्सनचे व्हिडिओ गाजतायत. पण बाबा जॅक्सन फक्त एवढ्यावरच थांबला नाही. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीसुद्धा त्याचं कौतुक केलं. तर हृतिक रोशन, टायगर श्रॉफसुद्धा त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. बाबा जॅक्सनचं हे टॅलेण्ट आता जगासमोर आलंय ते बॉलिवूडच्याच सेलिब्रिटींमुळे.

अनेक संकटांवर मात करुन हे सेलिब्रेटी आले एकत्र, रिअल लाइफ फिल्मी लव्हस्टोरी

स्ट्रीट डान्सर 3 डी या सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी एका ठिकाणी बाबा जॅक्सनला बोलावलं गेलं. मग काय बाबा जॅक्सनने इथेसुद्धा त्याचा जलवा दाखवलाच. वरुण धवन, श्रद्धा कपूर यांच्यासमोर बाबा जॅक्सनने मुकाबला गाण्यावर डान्स केला आणि सगळ्यांनीच तोंडात बोटं घातली. बाबा जॅक्सन सध्या दिल्लीत एका डान्सग्रूपसोबत काम करतो. त्याचा हा अदभूत आविष्कार पाहता बाबा जॅक्सनसाठी अब बॉलिवूड भी दूर नहीं.

...म्हणून सेजल शर्माने उचलले टोकाचे पाऊल, ग्लॅमर्स दूनियेचा आणखी एक बळी!

@babajackson2020#StreetDancer3D varundvn redfmindia shraddhakapoor theraghav_juyal harpreet_sdc♬ original sound - Yuvraj Singh

काही दिवसांपूर्वी बाबा जॅक्सनच्या टीकटॉक (tik tok) वरील एका व्हिडिओनं ट्विटरवर चांगला धुमाकूळ घातला होता. रेमो डिसूझाचा आगामी चित्रपट 'स्ट्रीट डांसर 3' च्या नव्या गाण्यासाठी हा युवक डान्स करत असल्याचं पाहायला मिळालं. एकाच नाही तर अनेक गाण्यांवर या युवकानं ठेका धरला आणि कोरियोग्राफरसह अनेक नेटकरी आणि सेलिब्रिटींची मन जिंकून घेतली. त्याचा जबरदस्त डान्स पाहून मायकल जॅक्सनची आठवण आल्याशिवाय रहात नाही.

'दिल तो हॅप्पी है' फेम अभिनेत्री सेजल शर्माची गळफास घेऊन आत्महत्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 25, 2020 10:17 AM IST

ताज्या बातम्या