S M L

कॅम्पा कोला इमारत प्रकरणावर येतेय वेब सीरिज

हाच लढा आता वेब सीरिजच्या रूपात समोर येणार आहे. आणि यात मुख्य भूमिका करणार आहेत अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर.

Updated On: Aug 30, 2018 12:45 PM IST

कॅम्पा कोला इमारत प्रकरणावर येतेय वेब सीरिज

मुंबई, 30 आॅगस्ट : तुम्हाला कॅम्पा कोला इमारतीचं प्रकरण आठवत असेल. ही इमारत अनधिकृत घोषित केल्यावर तिथल्या रहिवाशांनी मोठा लढा दिला होता आणि अापले संसार वाचवले होते. हाच लढा आता वेब सीरिजच्या रूपात समोर येणार आहे. आणि यात मुख्य भूमिका करणार आहेत अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर.

सुप्रिया पिळगांवकर या लवकरच एका वेब सिरिजच्या माध्यमातून आपल्या भेटीला येणारेत. अल्ट बालाजी या अॅपच्या माध्यमातून रिलीज होणाऱ्या सीरिजचं नाव आहे 'होम'.12 एपिसोडच्या माध्यमातून भेटीला येणारी ही सीरिज कँम्पा कोला इमारतीसाठी रहिवाशांनी दिलेल्या संघर्षावर आधारित असल्याची चर्चा आहे. या इमारतीतील रहिवाशांनी पुकारलेला लढा या सीरिजद्वारे आपल्याला पहायला मिळणारे. सुप्रिया पिळगावकर, अन्नू कपूर, अमोल पराशर, परिक्षित सहानी यांच्या या वेब सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत आहेत.

होममध्ये सुप्रिया गृहिणीच्या भूमिकेत आहेत. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, ' मी स्वत: एक आई आहे. शिवाय आईच्या अनेक भूमिका मी साकारल्यात. या वेब सीरिजमध्ये मी आहे तशीच मला दाखवायचं होतं. त्यामुळे शूट खूप सोपं गेलं आणि वेब सीरिज हे एकदम प्रभावी माध्यम आहे. मला अशा सीरिज करायला नेहमीच आवडेल.'

सुप्रिया म्हणाल्या, 'मी घरी माझे पती, मुलगी श्रीया, सासू यांच्या सोबत राहते. घराची सर्व काळजी घेते. श्रीया घरी आल्याशिवाय मला झोपही येत नाही. काही जण तर मला घरकोंबडी म्हणतात.'

Loading...
Loading...

'होम'मध्ये आपल्याला अन्नू कपूर आणि सुप्रिया पिळगावकर यांची जुगलबंदी पाहायला मिळणार. त्यांची वेगळीच केमिस्ट्री प्रोमोमध्ये जाणवते.

हेही वाचा

कपिल शर्मा परत येतोय!

माझं आणि काशिनाथ घाणेकरांचं व्यक्तिमत्त्वं पूर्ण वेगळं - सुबोध भावे

सोशल मीडियावरील अश्लिल फोटोंना वैतागली कविता कौशिक, उचलले मोठे पाऊल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 30, 2018 12:36 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close