Big Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय?

Big Boss 12 : जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे, जलोटांसोबतच्या रिलेशनचं सत्य काय?

एक धक्कादायक बातमी समोर आलीय. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय.

  • Share this:

मुंबई, 21 सप्टेंबर : 'बिग बाॅस 12' जास्त चर्चेत आला तो अनुप जलोटा आणि जसलीन मथारू यांच्यामुळे. पहिल्याच दिवशी आपण गेली 3 वर्ष रिलेशनशिपमध्ये आहेत, असं त्यांनी सांगितलं होतं. तेव्हापासून या नात्यातला खरेपणा किती आहे हे शोधण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतोय.

त्यात एक धक्कादायक बातमी समोर आलीय. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यात जसलीन म्हणतेय, मी सिंगल आहे. आणि ती बाॅयफ्रेंड शोधतेय. हा व्हिडिओ एक वर्षापूर्वीचाच आहे.

कदाचित बिग बाॅस 12चा टीआरपी वाढवण्यासाठी हे रिलेशनशिप बनवलं तर नाही ना, अशीही शंका मनात डोकावतेय.दोघांच्या वयात ३७ वर्षांचा फरक आहे. अनप ६५ वर्षांचे आहेत तर जसलीन २८ वर्षांची आहे. घरात दोघांची एण्ट्री झाल्यावर इतर स्पर्धकांना धक्काच बसला. पण त्याहून मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा जसलीन घरात आल्यानंतर अनुप यांच्यापासून दूर राहू लागली.

ट्रेलर : विराट कोहलीचा चित्रपट? २८ तारखेला उलगडणार सिक्रेट

अनिकेत विश्वासराव निघालाय प्रार्थना बेहरेसोबत आनंदाच्या प्रवासाला

KBC : विराटवरून बिग बींनी चिडवलं अनुष्का शर्माला!

जसलीन बिग बॉसच्या घरात पार्टनर गायक अनुप यांच्यासोबत आली. एकीकडे अनुप इतर सदस्यांशी बोलण्यात व्यग्र होते. तर दुसरीकडे जसलीन तिचा बेड बुक करण्याच्या प्रयत्नात होती. तिने स्वतःसाठी सिंगल बेड निवडला जो टीव्ही स्टार दीपिका कक्कडच्या शेजारी आहे.

हे पाहून अनुप म्हणाले की, ‘अरे मी तर फार लांब गेलो.’ अनुप यांचे हे बोलणं ऐकून जसलीन म्हणाली की, ‘मी तुमच्यासाठी चांगला पार्टनर असलेला बेड शोधून देते.’

जसलीन आणि अनुप एकमेकांना लव्ह बर्ड म्हणवतात. मात्र सलमानपासून घरातील इतर सदस्यांना त्या दोघांचे प्रेम पचनी पडत नाहीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2018 06:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading