अर्जुन आणि परिणिती 'फरार'

अर्जुन आणि परिणिती 'फरार'

अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्रा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. त्यांच्या या नव्या सिनेमाचं नाव अखेरीस फायनल करण्यात आलंय.'संदीप और पिंकी फरार' असं या सिनेमाचं नाव आहे.

  • Share this:

05जुलै : 'इशकजादे' सिनेमानंतर पुन्हा एकदा अर्जुन कपूर आणि परिणिती चोप्रा रुपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. त्यांच्या या नव्या सिनेमाचं नाव अखेरीस फायनल करण्यात आलंय.'संदीप और पिंकी फरार' असं या सिनेमाचं नाव आहे.

हा एक थ्रिलर ड्रामा सिनेमा असेल. दोन वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या या दोघांना एकामेकांचे स्वभाव अजिबात आवडणार नाहीत पण हे एकामेकांशिवाय राहूही शकणार नाहीत. तुझं माझं जमेना अन् तुझ्यावाचून करमेना अशी या दोघांची परिस्थिती असेल.

दिबाकर बॅनर्जी या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटासाठी दिबाकरला सारं काही नव्याने शिकावं लागलं. हा एक अत्यंत वेगळा सिनेमा असेल असं दिबाकरचं म्हणणं आहे. दिबाकर हा एक धडाडीचा दिग्दर्शक आहे.

मी परिणिती सोबत पुन्हा एकदा काम करण्यास फार उत्साही असल्याचंही अर्जुनने म्हटलंय. तर अर्जुन आणि दिबाकरसोबत काम करण्याचं माझं स्वप्न पूर्ण होतंय असं परिणितीचं म्हणणं आहे.

 

First published: July 5, 2017, 11:06 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading