News18 Lokmat

दीपिका पदुकोणनं केली लग्नाची घोषणा, ट्विटरवर केली पत्रिका शेअर

दीपिका आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचा बार दिवाळीनंतर उडणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 21, 2018 04:43 PM IST

दीपिका पदुकोणनं केली लग्नाची घोषणा, ट्विटरवर केली पत्रिका शेअर

मुंबई, 21 आॅक्टोबर : दीपिका आणि रणवीर सिंग यांच्या लग्नाचा बार दिवाळीनंतर उडणार आहे. दीपिकानं ट्विट करून लग्नाची तारीख सांगितलीय. 14 आणि 15 नोव्हेंबरला दोघांचं लग्न होणार आहे.

नवरात्रीनंतर दीपिकाची आई देवीचा एक खास यज्ञ करणार होती. यासाठी या दोघांना बंगळुरूला एकत्र हजर रहायचं होतं. त्यापूर्वी ही घोषणा होईल असा अंदाज होता. लग्न मात्र इटलीत होणार हे नक्की.

एका मुलाखतीत दीपिकाला विचारलं होतं. रणवीरचं पहिलं इम्प्रेशन कसं होतं? या प्रश्नावर दीपिका म्हणाली, ' त्याचा बँड बाजा बारात सिनेमा मी पाहिला होता. त्यावेळी माझा एजंट म्हणाला हा मोठा स्टार बनेल. पण मीच म्हटलं, मला नाही असं वाटत.'

Loading...

एवढंच नाही, तर दीपिकानं सांगितलं, रणवीर तिच्या टाइपचा नाही. पण त्याचा अभिनय पाहून मी प्रभावित झालीय. त्यानं दिल्लीच्या मुलाचा अभिनय इतका तंतोतंत केला की मला माहीतच नव्हतं तो मुंबईचा आहे म्हणून.

दीपिका जेव्हा एका रेस्टाॅरंटमध्ये रणवीरला भेटली, तेव्हा तिनं त्याला विचारलं की तू मुंबईला शिफ्ट झालास का? त्यावेळी रणवीर आपल्या आई-वडिलांबरोबर डिनरला आला होता. दीपिकाला पाहून तो आईच्या कानात कुजबुजला, ही माझी आवडती हिराॅइन. मी हिचा फॅन आहे.

दीपिका म्हणते, प्रेमात फक्त शारीरिक जवळीक जरुरी नसते. तर मनं जुळावी लागतात. एकमेकांना समजून घ्यावं लागतं. पण सगळे असा विचार नाही करत.

गेस्ट लिस्टबद्दल बोलायचं झालं तर लग्नात ठराविक जवळच्याच लोकांना आमंत्रित करण्यात येणार आहे.

न्यूयॉर्कमध्ये आलिया-रणबीर करत आहेत शॉपिंग

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 21, 2018 04:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...