महेश कोठारेंच्या घरावर ‘स्पेशल 5’चा छापा

महेश कोठारेंच्या घरावर ‘स्पेशल 5’चा छापा

सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या घरावर नुकताच ‘स्पेशल 5’ च्या टीमने छापा मारला. या छाप्यासाठी कारणीभूत ठरली महेश कोठारे यांची प्रसिद्धी.

  • Share this:

मुंबई, 3 डिसेंबर : सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या घरावर नुकताच ‘स्पेशल 5’ च्या टीमने छापा मारला. या छाप्यासाठी कारणीभूत ठरली महेश कोठारे यांची प्रसिद्धी. ऐकून आश्चर्य वाटत असलं तरी हे खरं आहे.

महेश कोठारे यांना आपण बऱ्याच सिनेमांमध्ये धडाकेबाज पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकांमध्ये पाहिलंय. त्यांचा सळसळता उत्साह तरुणाईला नवी ऊर्जा देतो. महेशजींच्या या एनर्जीमागे नेमकं काय रहस्य आहे, हेच जाणून घेण्यासाठी ‘स्पेशल 5’च्या टीमने त्यांच्या घरावर छापा टाकला.

‘स्पेशल 5’ची ही टीम स्टार प्रवाहवरील नव्या क्राईम शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं म्हणत देशाची सेवा करण्याचा यांनी वसा घेतलाय. म्हणूनच तर 5 जिगरबाज पोलिसांची ही टीम खऱ्या अर्थाने स्पेशल आहे.

महेश कोठारेंसोबत रंगलेल्या मनसोक्त गप्पांमधून ‘स्पेशल 5’च्या टीमला बऱ्याच टीप्स मिळाल्या आणि ही भेट खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरली.

तेव्हा ‘स्पेशल 5’ टीमची शौर्यगाथा १० डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर पाहता येईल.

महेश कोठारेंची विठुमाऊली मालिकाही सुरू आहे.भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या ‘विठ्ठला’ला  माणूसपण चुकलेलं नाही. किंबहुना त्यामुळेच विठ्ठल आपला देव आहे. भक्तांची ही माऊली आजही एकटीच विटेवर उभी आहे,त्याची अर्धांगिनी त्याच्या बाजूला,पण त्याच्यासोबत नाही, कारण रखुमाई रुसली आहे. या मागची गोष्ट  विठ्ठल-रुक्मिणी-सत्यभामा यांच्या प्रेमाची अनोखी कहाणी  'विठूमाऊली' या मालिकेच्या रूपानं स्टार प्रवाहवर सुरू आहे.त्याआधी जय मल्हार खूप लोकप्रिय झाली होती.

...म्हणून रणबीर दीपवीरच्या रिसेप्शनला दिसला नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 3, 2018 05:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading