मुंबई, 16 आॅक्टोबर : फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर यांच्या रिलेशनशिपची चर्चा बऱ्याच दिवस सुरू आहे. पण त्यावर काही शिक्कामोर्तब होत नव्हतं. फक्त दोघांचे एकत्र फोटो पाहून अंदाज बांधले जात होते.
काही दिवसांपूर्वी शाबानीनं इन्स्ट्रावर आपला एक फोटो टाकला होता. त्यात मिस्ट्री मॅन असा उल्लेख केला होता. तेव्हाही तो फरहान असल्याचं अनेकांनी ओळखलं.
आता तोच फोटो फरहाननं पोस्ट केलाय. त्याखाली काहीही न लिहिता फक्त हार्ट पोस्ट केलंय. त्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपवर मोहोर उमटलीय.
2016मध्ये फरहान आणि अधुना यांचा घटस्फोट झाला. फरहान आणि शिबानी हे दोघे २०१५पासून एकमेकांना ओळखतात. त्यानंतर आता बऱ्याच ठिकाणी एकत्र पाहिलं गेलंय. शिबानी ही प्रसिद्ध वीजे आणि अँकर अनुषा दांडेकरची बहीण आहे.
अधुना तिच्या घटस्फोटानंतर डिनो मोरीयाचा भाऊ निकोल मोरीयासोबत असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. तर श्रद्धा आणि फरहान विभक्त झाल्यानंतर श्रद्धा एका फोटोग्राफरसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. भावेश जोशी या चित्रपटात शिबानीने अर्जुन कपूरसोबत एक आयटम नंबर केला आहे. याशिवाय तिनं एका संघर्ष या मराठी सिनेमातही आयटम नंबर केला होता.
दोघं एकमेकांच्या गाढ प्रेमात आहेत. शिबानी फरहानला आपला पाठिंबा उघडपणे दाखवते. बाॅलिवूडमध्ये असे वेगवेगळे प्रेमाचे खेळ नेहमीच पाहायला मिळतात. बऱ्याचदा ते क्षणभंगुरही असतं. पण आता फरहान आणि शिबानी एकमेकांबद्दल सीरियस आहेत असं जाणवतंय.
पुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा