काॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला

काॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला

कोकिलाबेन हाॅस्पिटलमध्ये दोघं उपचार घेतायत. स्पाॅट बाॅयच्या माहितीनुसार डाॅक्टरांनी उपचार सुरू केलेत. थोडे दिवस त्यांना हाॅस्पिटलमध्येच राहावं लागेल.

  • Share this:

मुंबई, 24 सप्टेंबर : काॅमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा बिग बाॅसमध्ये अशी बरीच चर्चा होती. बिग बाॅसच्या प्रीमियरला भारतीनं तशा मुलाखतीही मीडियाला दिल्या. पण ती कुठेच दिसली नाही. याचं खरं कारण समोर आलंय.

भारती आणि तिचा नवरा हर्ष यांना डेंग्यू झालाय. कोकिलाबेन हाॅस्पिटलमध्ये दोघं उपचार घेतायत. स्पाॅट बाॅयच्या माहितीनुसार डाॅक्टरांनी उपचार सुरू केलेत. थोडे दिवस त्यांना हाॅस्पिटलमध्येच राहावं लागेल.

भारतीचा नवा टाॅक शो येणार आहे. 'भारती का शो - आना ही पड़ेगा' असं या शोचं नाव आहे. त्याचं शूटिंगही सुरू झालंय. शिवाय इंडियाज गाॅट टॅलेंटच्या नव्या सीझनचं ती सूत्रसंचालन करणारेय.

कॉमेडी क्विन भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया हे दोघे  3 डिसेंबरला लग्नाच्या बंधनात अडकले . त्यांच्या या लग्नसोहळ्यात बॉलिवूडच्या अनेक मंडळींनी हजेरी लावली होती. या लग्नसोहळ्यातले अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत. त्यातला एक व्हिडिओ गाजतोय तो राखी सावंतच्या नागिन डान्सचा!

तिने ढोलाच्या तालावर ठूमका मारत नागिन डान्स केला आहे. तिच्या या मजेशीर डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच गाजला होता. यातल्या एका व्हिडिओमध्ये राखी सावंत नागिन डान्स करताना दिसत होती. ढोल-नगाड्याच्या तालावर राखी चांगलीच थिरकताना दिसत होती. राखीने तिच्या ढिंच्याक स्टाईलमध्ये अगदी जमिनीवर बसून नागिन डान्स केला.

त्याचबरोबर एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये राखीसोबत आरजे मलिष्कानेही ताल धरला होता. राखी आणि मलिष्काच्या या डान्स व्हिडिओला सोशल मीडियावरही चांगलीच पसंती मिळाली.नवरी मुलगी मात्र सगळ्यांसोबत फोटो काढताना दिसत होती. त्यामुळे भारतीच्या लग्नात सगळ्यांनीच धमाल केली असं म्हणायला हरकत नाही.

TRP : एकता कपूरसमोर टिकू शकले नाहीत बिग बी!

First published: September 24, 2018, 11:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading