Home /News /entertainment /

'तारक मेहता..'मध्ये दिशा वकानीची जागा घेणार नवी अभिनेत्री? निर्मात्यांनी दिली मोठी हिंट

'तारक मेहता..'मध्ये दिशा वकानीची जागा घेणार नवी अभिनेत्री? निर्मात्यांनी दिली मोठी हिंट

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिका गेली 14 वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. यातील प्रत्येक कलाकार लोकांच्या ओळखीचा बनला आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये अनेक कलाकारांनी या मालिकेला निरोप दिला आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 25 मे-   'तारक मेहता का उल्टा चष्मा'  (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)  ही मालिका गेली 14  वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. यातील प्रत्येक कलाकार लोकांच्या ओळखीचा बनला आहे. परंतु गेल्या काही वर्षांमध्ये अनेक कलाकारांनी या मालिकेला निरोप दिला आहे. अलीकडेच 'तारक मेहता' या शोमध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या शैलेश लोढा यांनी शोचा निरोप घेतला. सध्या ते एका नवीन शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये 'बबिता जी'ची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ताही शो सोडू शकते, अशी चर्चा आहे. शोमधून आणखी एक पात्र बऱ्याच दिवसांपासून गायब आहे आणि हे पात्र म्हणजे 'दयाबेन' (Dayaben). या पात्राला या मालिकेचा जीव की प्राण म्हटलं जातं. आतापर्यंत ही भूमिका तारक मेहतामध्ये दिशा वकानी   (Disha Vakani)  साकारत होती. आता या शोला नवीन दयाबेन मिळाल्याची चर्चा सुरु आहे.या शोमध्ये दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी गेल्या चार वर्षांहून अधिक काळ शोपासून दूर आहे. अशा परिस्थितीत आता निर्मात्यांनी तिच्या जागी नवी अभिनेत्री घेण्याचे ठरवले असल्याचे बोलले जात आहे. शोचे निर्माते असित मोदी यांनीही या वृत्तांवर प्रतिक्रिया दिली असून लवकरच प्रेक्षकांना या मजेदार शोमध्ये नवीन दयाबेन पाहायला मिळणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. ETimes शी संवाद साधताना, शोचे निर्माते असित कुमार मोदी यांनी कन्फर्म केल की चाहते लवकरच दयाबेनला शोमध्ये पाहणार आहेत. या वर्षी दयाबेनला पुन्हा पडद्यावर आणण्याची योजना असल्याचंही त्यांनी उघड केलंय. यावेळी बोलताना असित मोदीयांनी म्हटलं- 'आमच्याकडे दयाबेनचे पात्र परत न आणण्याचे कारण नाही. पण अलीकडच्या काळात आपण सर्वांनी कठीण प्रसंगांचा सामना केला आहे. 2020-21 हा आपल्या सर्वांसाठी खूप कठीण काळ होता. पण आता परिस्थिती सुधारली आहे. 2022 मध्ये आम्ही दयाबेनचे पात्र परत आणणार आहोत.प्रेक्षकांना पुन्हा एकदा जेठालाल आणि दयाबेनचं मनोरंजन पाहायला मिळणार आहे. तथापि, निर्मात्यानीं असंही सांगितलं की, दिशा वकानी दयाबेनच्या भूमिकेत पडद्यावर परत येईल की त्यांना या भूमिकेसाठी नवीन अभिनेत्री शोधावी लागेल हे अद्याप त्यांना माहित नाही. त्यांनी पुढं सांगितलं- 'दिशा वकानी दया बेनच्या भूमिकेत परत येईल की नाही हे मला अजून माहीत नाही. दिशाजीसोबत आमचे अजूनही चांगले संबंध आहेत. आम्ही एका कुटुंबासारखे आहोत. पण, आता त्यांचं लग्न झालं आहे आणि त्यांना मुलंही आहेत आणि प्रत्येकजण आपापल्या जबाबदाऱ्यांमध्ये व्यग्र आहे.पण दिशाबेन किंवा निशाबेन काहीही असो पण तुम्हाला दयाबेन नक्कीच मिळेल आणि आम्ही एक टीम म्हणून असेच मनोरंजन देण्याचा प्रयत्न करू''.असं म्हणत निर्मात्यांनी सर्वानांच संभ्रमात टाकलं आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Entertainment, Tarak mehta ka ooltah chashmah, Tv actors

    पुढील बातम्या