Home /News /entertainment /

आदित्य ठाकरेंशी भेट झाली होती का? सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीने केला महत्त्वपूर्ण खुलासा

आदित्य ठाकरेंशी भेट झाली होती का? सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीने केला महत्त्वपूर्ण खुलासा

आदित्य ठाकरे आणि सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीची भेट झाली का, याबाबत चर्चा सुरू होती.

    नवी दिल्ली, 18 ऑगस्ट : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजूपत याच्या आत्महत्येनंतर देशभर वादळ निर्माण झालं. सुशांतच्या कुटुंबासह भाजपने या प्रकरणाच्या तपासाबाबत मुंबई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं. महाराष्ट्र सरकारमधील एका युवा मंत्र्यांच्या दबावामुळे सुशांत आत्महत्या प्रकरणात योग्य दिशेने तपास होत नसल्याचा आरोप करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर निशाणा साधण्यात आला. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि सुशांतची गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीची (Rhea Chakraborty) भेट झाली का, याबाबत चर्चा सुरू होती. मात्र आता याप्रकरणी अखेर रिया चक्रवर्तीने खुलासा केला आहे. 'आदित्य ठाकरे यांची कधीही भेट घेतली नाही किंवा बोलणे देखील झाले नाही. या प्रकरणात आता सर्व राजकारण करण्यात येत आहे. तिच्या शांततेला दुबळेपणा समजू नका. बेकायदेशीर चौकशीसाठी पुढाकार घेणार नाही,' अशी भूमिका रिया चक्रवर्तीच्या लीगल टीमकडून जाहीर करण्यात आली आहे. रिया चक्रवर्तीच्या टीमकडून खुलासा करण्यात आल्यानंतर आता आदित्य ठाकरे यांच्याभोवती निर्माण करण्यात आलेलं संशयाचं धुकं कमी होणार की वाढणार , हे पाहावं लागेल. आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप, शिवसेनेनं दिलं होतं प्रत्युत्तर 'दिनो मोरिया व इतर सिनेनट हे राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मित्रपरिवारातले आहेत व त्यामुळेच आरोपांच्या फैरी मुख्यमंत्री ठाकरे व आदित्य ठाकरेंवर झडत असतील तर ते चूक ठरेल. पुराव्याशिवाय बोलणे व आरोप करणे हे नैतिकतेस धरून नाही. पुरावे आहेत काय? गोध्रा दंगल, त्या निमित्ताने झालेल्या हत्यांचा तपास सीबीआयकडे जाऊ नये, कारण सीबीआय म्हणजे केंद्रीय सत्ताधाऱ्यांचे राजकीय हत्यार असल्याचे मत तेव्हा मोदी-शहांचे होते. हेच मत सुशांतसिंह राजपूत प्रकरणात व्यक्त झाले तर काय चुकले?' असा सवाल करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरील आरोपांना उत्तर दिलं होतं.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Aaditya thackeray, Sushant sing rajput

    पुढील बातम्या