Home /News /entertainment /

मालदीवहून परतलेल्या सेलिब्रिटींचं नेटकऱ्यांनी असं केलं स्वागत

मालदीवहून परतलेल्या सेलिब्रिटींचं नेटकऱ्यांनी असं केलं स्वागत

अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) , रणबीर कपूर (Ranbir Kapoor), दिशा पटानी (Disha Patani), टायगर श्रॉफ (Tiger Shroff), हे मालदीव ला सुट्ट्या साजऱ्या करत होते तर आजच ते मुंबईत परतले आहेत.

  मुंबई 25 एप्रिल : देशभरात कोरोनाची परिस्थिती पाहता महाराष्ट्रासह अन्य काही ठिकाणी लॉकडाउन लावण्यात आला. पण याच लॉकडाउनमध्ये अनेक सेलिब्रिटींनी सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी देशाबाहेर जाणं पसंत केलं होतं. त्यामुळे देशातील जनतेला वाईट परिस्थितीत सोडून आनंद लुटण्यासाठी गेल्याचा आरोप अनेकांनी या सेलिब्रिटीज केला होता. अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) , रणबीर कपूर (Ranbir Kapoor), दिशा पटानी (Disha Patani), टायगर श्रॉफ (Tiger Shroff), हे मालदीव ला सुट्ट्या साजऱ्या करत होते तर आजच ते मुंबईत परतले आहेत त्यामुळे पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी त्यांना निषाणा केलं आहे. मुंबई एअरपोर्टवरील त्यांचे फोटो पाहून अनेकजणांनी संताप व्यक्त केला आहे.
  एका युझरने लिहिलं परत येण्याची गरज नव्हती. तर एकाने लिहिलं, लॉकडाउन हा फक्त गरिबांसाठी आहे. तर काहींनी त्यांचे चित्रपट पाहणार नसल्याचं म्हटलं. रणबीर आलिया आधी अभिनेत्री सारा अलि खान, जान्हवी कपूर याशिवाय अनेक टिव्ही सेलिब्रिटीही मालदीवला सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेले होते. तर अभिनेत्री अनन्या पांडे आणि शाहरुख खानचं संपूर्ण कुटुंब हे अमेरिकेला रवाना झालं आहे.

  उर्वशी करतेय गुरु रांधवाचा मेकअप; VIDEO पाहून पुन्हा चर्चेला उधाण

  त्यामुळे देशाच्या कठीण काळात सेलिब्रिटींनी देश सोडल्याचा आरोप त्यांच्यावर केला जात आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

  नुकतच अभिनेता नवाजुद्दीन सिद्धिकी (Nawazuddin Siddhiqui) याने देखील सेलिब्रिटींना व्हेकेशन वरुन फटकारलं आहे. ‘लोकांना जेवायला अन्न नाही, आणि तुम्ही सुट्ट्यांवर पैसे उडवत आहात, थोडी तरी लाज बाळगा, त्यांनी तर मालदीवचा तमाशा करून सोडलाय. मला माहित नाही त्यांची टुरिझम इंडस्ट्रीसोबत काय अरेंजमेंटस आहेत, मात्र या लोकांनी निदान माणुसकी म्हणून आपल्या सुट्टीचे फोटो सोशल मीडियावर न टाकता स्वतः पुरता मर्यादित ठेवावेत. देशात सर्व लोक अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहेत. कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. लोक खुपचं त्रस्त आहेत. अशामध्ये तुमच्या सुट्टीचे फोटो त्यांना दाखवून त्यांचा धीर खचू देऊ नका.' असं नवाजुद्दीनने म्हटलं.
  Published by:News Digital
  First published:

  Tags: Alia Bhatt, Bollywood, Ranbir kapoor

  पुढील बातम्या