Sacred Games 2 : काटेकर आणि कुक्कू परत येणार? नेटफ्लिक्सने शेअर केला नवा व्हिडीओ

वेब सीरिजचं वेड लागणं काय असतं हे सेक्रेड गेम्सच्या चाहत्यांना विचारा.. सेक्रेड गेम्सचा पहिला सीझन संपल्यानंतर चाहत्यांनी लवकरात लवकर दुसरा सीझन काढण्यासाठी मोर्चेही काढले होते.

News18 Lokmat | Updated On: Apr 1, 2019 07:59 PM IST

Sacred Games 2 : काटेकर आणि कुक्कू परत येणार? नेटफ्लिक्सने शेअर केला नवा व्हिडीओ

मुंबई, १ एप्रिल- वेब सीरिजचं वेड लागणं काय असतं हे सेक्रेड गेम्सच्या चाहत्यांना विचारा.. सेक्रेड गेम्सचा पहिला सीझन संपल्यानंतर चाहत्यांनी लवकरात लवकर दुसरा सीझन काढण्यासाठी मोर्चेही काढले होते. त्यांची ही मागणी सेक्रेड गेम्सच्या टीमने ऐकली आणि येत्या काही दिवसांमध्ये या वेब सीरिजचा दुसरा भाग कधी प्रदर्शित होणार याचा मोठा खुलासा होणार आहे.

दरम्यान नेटफ्लिक्सने सेक्रेड गेम्सचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित केला आहे. या टीझरमध्ये काटेकर, कुक्कू आणि बंटीची झलक पाहायला मिळते. हा टीझर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘कोणी बोलतं हे खरंय.. तर कोणी बोलतं ही मस्करी आहे. पण मंडाला कधीच कोणाला समजला नाही.’ टीझरमध्ये काटेकर, बंटी आणि कुक्कू स्वतःच्या डोक्यावर हाताने बंदुक धरताना दिसत आहेत. त्यामुळे सीक्वलमध्ये काटेकर आणि कुक्कू परत येतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.


काही दिवसांपूर्वी टफ्लिक्स इंडियाने चार फोटोंसोबत चार नावं शेअर केली. सेक्रेड गेम्स २ च्या चार एपिसोडशी ही चार नावं जोडली जात आहेत. Bidalah-a-Gita, Katham Asti, Antara Mahavana आणि Unagamam अशी ही चार नावं आहेत.

ही चारंही नावं सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सिझनशी निगडीत आहेत हे जवळपास निश्चित आहे. सेक्रेड गेम्सच्या पहिल्या सिझनमध्ये आठ एपिसोड होते. यातील व्यक्तिरेखा या हिंदू पौराणिक कथा आणि व्यक्तिरेखांमधून घेतले होते. अश्वथामा, हलाहल, अतापी वतापी, ब्रह्महत्या, सारामा, प्रेतकल्प, रूद्रा आणि ययाती अशी व्यक्तिरेखांची नावं होती.

Loading...


क्राइम थ्रिलरवर आधारित वेब सीरिजबद्दल प्रेक्षकांमध्ये तुफान उत्साह पाहायला मिळतो. पहिला सिझन संपल्यानंतर चाहत्यांच्या मनात दुसऱ्या सीझनचे अनेक प्रश्न उपस्थित झाले. सेक्रेड गेम्सला फक्त भारतातच नाही तर जगभरात यश मिळालं.

सेक्रेड गेम्समध्ये सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या मुख्य भूमिका होत्या. दोन्ही कलाकारांच्या सशक्त अभिनयामुळे संपूर्ण सीरिज लक्षात राहिली. कुब्रा सैतसारख्या अभिनेत्रीला या सीरिजमुळे प्रसिद्धी मिळाली.

सेक्रेड गेम्स ही वेब सीरिज विक्रम चंद्रा यांच्या कादंबरीवर आधारित आहे. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी मिळून या वेब सीरिजचं दिग्दर्शन केलं. नवाजुद्दीनचा भाग अनुराग कश्यपने आणि सैफ अली खानचा भाग विक्रमादित्य मोटवानीने दिग्दर्शित केला होता.

VIDEO: वडिलांचं नाव लावणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क - पंकजा मुंडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 07:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...