मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

घरबसल्या सेलिब्रेट करा ख्रिसमस आणि नववर्ष; ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाचा तडका

घरबसल्या सेलिब्रेट करा ख्रिसमस आणि नववर्ष; ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोरंजनाचा तडका

ख्रिसमस आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्याचा आनंद वाढवण्यासाठी प्रेक्षकांकरता धमाकेदार चित्रपट, वेबसिरीज सज्ज आहेत.

ख्रिसमस आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्याचा आनंद वाढवण्यासाठी प्रेक्षकांकरता धमाकेदार चित्रपट, वेबसिरीज सज्ज आहेत.

ख्रिसमस आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्याचा आनंद वाढवण्यासाठी प्रेक्षकांकरता धमाकेदार चित्रपट, वेबसिरीज सज्ज आहेत.

  • Published by:  Amruta Abhyankar
मुंबई, 21 डिसेंबर: सध्या कोविड 19च्या (Covid 19) साथीमुळे गेले सात-आठ महिने चित्रपटगृहे बंदच होती, आता काही नियमांसह चित्रपटगृहं खुली करण्यात आली आहेत, पण प्रेक्षकांचा प्रतिसाद थंड आहे. कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे प्रेक्षक चित्रपटगृहाकडे वळण्यास फारसे उत्सुक नाहीत. तसेच त्यांना हवा तो कंटेंट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platforms) उपलब्ध होत आहे. नेटफ्लिक्स (Netfilx), अॅमेझॉन प्राईम व्हिडीओ (Amazon Prime Video), डिस्ने प्लस हॉटस्टार (Disney+Hotstar), झी 5 (Zee 5), सोनी लिव्ह (Sony Liv) अशा विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर अगदी आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते स्थानिक पातळीवरील कंटेंट घरबसल्या हवा तेव्हा उपलब्ध होतो. यामध्ये चित्रपटांपासून ते मालिका, वेबसीरिज असा वैविध्यपूर्ण मनोरंजनाचा खजिना खुला असतो. त्यामुळे आता येणारे नवीन चित्रपटही (Movies) चित्रपटगृहाऐवजी ओटीटी प्लॅटफॉर्मवरच रिलीज करण्यात येत आहेत. ख्रिसमस आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्याचा आनंद वाढवण्यासाठी प्रेक्षकांकरता धमाकेदार चित्रपट, वेबसिरीज सज्ज आहेत. जाणून घेऊ या कोणते आहेत हे चित्रपट आणि वेबसिरीज. डिसेंबरच्या या शेवटच्या दहा दिवसांमध्ये जॉर्ज क्लूनी (George  Clooney) याचा मिडनाईट स्काय (Midnight Sky) हा साय-फाय चित्रपट, वरुण धवन आणि सारा अली खान यांचा धमाल विनोदी हिंदी चित्रपट कुली. नं. 1 (Coolie No 1) आणि अभिनेता पंकज त्रिपाठीची मध्यवर्ती भूमिका असलेली वेबसिरीज क्रिमिनल जस्टिस सीझन 2 (Criminal Justice 2) याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबद्दल मनोरंजन जगतात जोरदार चर्चा सुरू आहे. मिडनाईट स्काय : जॉर्ज क्लूनीचा मिडनाईट स्काय हा चित्रपट 23 डिसेंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे. आर्टिक सर्कलमध्ये 2049 मध्ये घडणाऱ्या घटनांचा वेध घेणारा हा साय-फाय (Sci-fi)चित्रपट अतिशय उत्कंठावर्धक आहे. त्याशिवाय नेटफ्लिक्सवर भाग बॉम्बे रोज, एमएएनके, द व्हाईट टायगर असे चित्रपट रिलीज होणार आहेत, तर अनिल कपूर आणि अनुराग कश्यप यांचा एके व्हर्सेस एके 24 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. कुली. नं. 1 - वरुण धवन आणि सारा अली खान या जोडीच्या या धमाल विनोदी चित्रपटाबाबत खूपच चर्चा सुरू असून प्रेक्षक आतुरतेनं याची वाट पाहत आहेत. Amazon Prime वर 25 डिसेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे. गोविंदा आणि करिष्मा कपूर यांच्या 1995मध्ये तुफान गाजलेल्या कुली. नं. 1 चित्रपटाचा हा रिमेक आहे. अॅमेझॉन प्राईमवर दुर्गावती, आय एम यूवर वूमन, मारा, सिल्व्हिज लव्ह असे चित्रपटही चर्चेत आहेत. क्रिमिनल जस्टिस सीझन 2 - आपल्या कसदार अभिनयानं सध्या पंकज त्रिपाठीनं ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घातला आहे. त्याची मध्यवर्ती भूमिका असलेली वेबसिरीज क्रिमिनल जस्टीसचा सीझन 2 डिस्ने प्लस हॉटस्टारवर 25 डिसेंबरपासून सुरू होत आहे. याशिवाय एनिमेटेड मुव्ही ‘सोल’, मुलान हे चित्रपटही बघता येणार आहेत. याशिवाय झी 5 वर शूट आउट अॅट अलएअर, बँग बँग या सिरीजही 25 डिसेंबरपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास येणार आहे. सोनी लीव्हवर सँडविच फॉरएव्हर हा चित्रपट 25 डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. याशिवाय अनेक कितीतरी ओटीटी प्लॅटफॉर्म प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी वेगवेगळ्या विषयांवरील कंटेंट घेऊन येत आहेत. त्यामुळे घरबसल्या प्रेक्षकांना चित्रपटासह मालिका, वेब सीरिज अशा सगळ्या प्रकारच्या मनोरंजनाचा आनंद घेता येत आहे.
First published:

Tags: Amazon, Netflix, OTT

पुढील बातम्या