नेतन्याहूंनी केलं बिग बींचं कौतुक, आॅस्कर सेल्फीत कलाकार झाले कैद

नेतन्याहूंनी केलं बिग बींचं कौतुक, आॅस्कर सेल्फीत कलाकार झाले कैद

यावेळी ते म्हणाले, 'सगळे जण बाॅलिवूडवर प्रेम करतात. इस्रायलही करतं आणि मीही करतो.' अमिताभ बच्चन यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला अनेक कलाकार उपस्थित होते.

  • Share this:

19 जानेवारी : इस्रायल पंतप्रधान नेतन्याहू आणि त्यांची पत्नी यांचं बाॅलिवूडच्या मायानगरीत जंगी स्वागत झालं. मुंबईत शालोम बॉलिवूड या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते बॉलिवूड कलाकारांना भेटले.  यावेळी ते म्हणाले, 'सगळे जण बाॅलिवूडवर प्रेम करतात. इस्रायलही करतं आणि मीही करतो.' अमिताभ बच्चन यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला अनेक कलाकार उपस्थित होते.

नेतन्याहूंनी बाॅलिवूड कलाकारांचं तोंडभरून कौतुक केलं. ते म्हणाले, ' अमिताभ बच्चन यांचे ट्विटर फाॅलोअर्स माझ्या फाॅलोअर्सपेक्षा 3 कोटी जास्त आहेत. मी इतर कलाकारांना पाहतो, तेही मोठे हस्ती आहेत.'

यावेळी बाॅलिवूडचे अनेक कलाकार उपस्थित होते. अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, करण जौहर, सुभाष घई, इम्तियाज अली, प्रसून जोशी, रणधीर कपूर, रोनी स्क्रूवाला, मधुर भंडारकर, विवेक ओबेरॉय, राज नायक,सारा अली खान या कार्यक्रमाला हजर होते. शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही हजर होते.

नेतन्याहू यांनी बाॅलिवूड कलाकारांना फोटो काढायला स्टेजवर बोलावलं. ते म्हणाले, आॅस्करचा एक फोटो व्हायरल झाला होता. त्यात ब्रँड पिट सेल्फी घेताना दिसत होते. म्हणून मलाही बाॅलिवूड स्टार्ससोबत सेल्फी काढायचीय. तसे बिग बींनी हातात सेल्फी स्टिक घेतली आणि इस्रायलच्या पंतप्रधानांबरोबर बाॅलिवूडनं सेल्फी काढली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 19, 2018 04:43 PM IST

ताज्या बातम्या