बाहुबलीसोबत लढणार नील नितीन मुकेश, 'साहो' सिनेमाच्या सेटवरचा फोटो केला शेअर

बाहुबलीसोबत लढणार नील नितीन मुकेश, 'साहो' सिनेमाच्या सेटवरचा फोटो केला शेअर

'साहो' चित्रपटात प्रभास आणि नील नितीन मुकेश पहिल्यांदा एकत्र अॅक्शन करताना दिसणार आहे. नुकताच नीलने इन्स्टाग्रामवर चित्रपटाच्या सेटवरचा एक फोटो शेअर केला आहे.

  • Share this:

हैदराबाद, 09 जानेवारी : 'बाहुबली'च्या दमदार यशानंतर सुपरस्टार प्रभास 'साहो' चित्रपटात दिसणार आहे. सिनेमाची घोषणा झाल्यावर प्रभासचे  चाहते मोठ्या आतुरतेनं वाट पाहत आहेत. साहो चित्रपट बाहुबलीपेक्षा जरा वेगळा आहे. यावेळी प्रभास हटके अॅक्शन करताना दिसणार आहे. नुकताच या सिनेमाच्या सेटवरचा एक फोटो सोशल मीडियावर  व्हायरल झाला आहे.

अभिनेता नील नितिन मुकेशनं साहो सिनेमाच्या सेटवरचा फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. नील नितीन मुकेश लवकरच प्रभाससोबत साहो चित्रपटात एकत्र दिसणार आहे. चित्रपटातील भूमिकेविषयी अद्याप काही माहिती मिळाली नाही. परंतु प्रभास मुख्य भूमिकेत असल्यामुळे नील खलनायकाच्या भूमिकेत दिसेल असा अंदाज आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये प्रभास आणि नील एकत्र दिसत आहेत. नील नितीन मुकेशचा स्टाईलिश लुक फोटोमधून समोर येत आहे. प्रभास आणि नील दोघेही फोटोमध्ये फार छान दिसत आहे. सध्या ते दोघेही हैदराबादमध्ये 'साहो' चित्रपटाचं शूटिंग पूर्ण करत आहे. नीलने हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत म्हटलं आहे की, 'साहोच्या सेटवर अतिशय उत्तम दिवस आहे'

 

View this post on Instagram

 

What a fab day on the sets of Saaho. @sujeethsign #prabhas #darling #hyderabad #teamwork #nnmteam

A post shared by Neil Nitin Mukesh (@neilnitinmukesh) on

चित्रपटात प्रभास आणि नीलसोबतच श्रद्धा कपूर, चंकी पांडे, जॅकी श्रॉफ, महेश मांजरेकर, मुरली शर्मा, आदित्य श्रीवास्तव असे दमदार कलाकार दिसणार आहेत. चित्रपट तेलगु आणि हिंदी अशा दोन भाषेमध्ये रिलीज होईल. 15 ऑगस्ट 2019 ला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून सिनेमाचं ट्रेलर लवकरच रिलीज केलं जाईल.

'साहो'ची माहिती झाली लीक, बाॅक्स आॅफिसवर कब्जा करण्यास येतोय प्रभास!

First published: January 9, 2019, 12:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading