अभिनेता नील नितिन मुकेशचा मुलीसोबत क्यूट डान्स, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

अभिनेता नील नितिन मुकेशचा मुलीसोबत क्यूट डान्स, सोशल मीडियावर VIDEO VIRAL

नील नेहमीच मुलगी नुरवी सोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो.

  • Share this:

मुंबई, 21 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेता नील नितिन मुकेश सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘बायपास रोड’च्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. हा सिनेमा येत्या 1 नोहेंबरला रिलीज होत आहे. नील या सिनेमात नेहमी पेक्षा थोड्या वेगळ्या अवतारात दिसणार आहे. सिनेमाचं वेळापत्रक कितीही व्यस्त असलं तरीही नील आपल्या फॅमिलीला पूर्ण वेळ देत असतो. खास करुन तो मुलगी नुरवी सोबतचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकताच त्यानं नुरवीसोबतचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे जो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

नीलनं त्याच्या इन्स्टाग्रामवर मुलगी नुरवीसोबतचा एक डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती त्याचा आगामी सिनेमा बायपास रोडचं गाणं ‘तन्हा मेरा प्यार’वर डान्स करताना दिसत आहे आणि त्याची मुलगी सुद्धा हा डान्स खूप एंजॉय करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करत असताना कॅप्शनमध्ये लिहिलं, कोणाला तरी त्याचं आवडतं डान्स साँग मिळालं आहे.

या सेलिब्रिटींनी बजावला मतदानाचा हक्क, तुम्ही बजावला का?

तन्हा मेरा प्यार हे ‘बायपास रोड’ रोडचं दुसरं गाणं आहे. काही दिवसांपूर्वीच हे गाणं रिलीज झालं. हे गाणं मोहित चौहाननं गायलं आहे. तर या गाण्याचे लिरिक्स रोहन गोखले यांनी लिहिलं आहे. हे गाणं नील नितिन मुकेश आणि अदा शर्मा यांच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे.

पॉप सिंगर लेडी गागानं ट्वीट केला संस्कृत श्लोक, सोशल मीडियावर खळबळ!

बायपास रोड हा एका सस्पेन्स सिनेमा आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन नमन नितिन मुकेशनं केलं आहे. या सिनेमात नील व्यतिरिक्त अदा शर्मा, शमा सिकंदर, गुल पनाग आणि सुधांशु पांडे हे स्टार दिसणार आहेत. याआधी नील नितिन मुकेश साहो सिनेमात दिसला होता. या सिनेमात त्यानं खलनायकी भूमिका साकारली होती.

'कबीर सिंह' मागे टाकत 'या' चित्रपटाने 2019मध्ये जमवला सर्वात जास्त गल्ला!

==============================================================

लोकसभेचे उमेदवार उदयनराजेंनी बजावला मतदानाचा हक्क, पाहा VIDEO

First published: October 21, 2019, 2:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading