मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

नेहुल आणि समीक्षा ठरले ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा’चे महाविजेते!

नेहुल आणि समीक्षा ठरले ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा’चे महाविजेते!

स्टार प्रवाह (star pravah) वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा’ कार्यक्रमाचा(mi honar superstar Jallosh Dance) महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला.

स्टार प्रवाह (star pravah) वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा’ कार्यक्रमाचा(mi honar superstar Jallosh Dance) महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला.

स्टार प्रवाह (star pravah) वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा’ कार्यक्रमाचा(mi honar superstar Jallosh Dance) महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला.

  • Published by:  sachin Salve

 

मुंबई, 29 नोव्हेंबर : स्टार प्रवाह (star pravah) वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा’ कार्यक्रमाचा(mi honar superstar Jallosh Dance) महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. नेहुल वारुळे (Nehul Warule) आणि समीक्षा घुले ( Samiksha Ghule) ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा’चे महाविजेते ठरले आहे. द लायन्स क्रु, विजय-चेतन, नेहुल–समीक्षा आणि मायनस थ्री या चार जणांमध्ये अंतिम लढत रंगली. पण या लढतीत पुण्याच्या नेहुल वारुळे आणि समीक्षा घुलेने बाजी मारली.

गेल्या काही दिवसांपासून रंगतदार सुरू असलेल्या ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष डान्सचा’ आज अंतिम एपिसोड मोठ्या थाटात पार पडला. नेहुल वारुळे आणि समीक्षा घुले विजयी ठरले आहे. तर उपविजेते ठरले द लायन्स क्रु. विजय-चेतन ही जोडी ठरली तृतीय क्रमांकाची मानकरी. तर मायनस थ्री ग्रुपला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आलं. यावेळी विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना नेहुल आणि समीक्षा दोघंही भावूक झाले होते. हा दिवस स्वप्नवत असल्याची भावना दोघांनीही व्यक्त केली.

इंग्लंडनंतर भारतीय क्रिकेटमध्येही वर्णद्वेषाचं वादळ, भारतीय स्पिनरचे गंभीर आरोप

महाअंतिम सोहळ्यात समीक्षाच्या हाताला दुखापत झाली होती. मात्र तरीही खचून न जाता समीक्षा आणि नेहुलने बेस्ट परफॉर्मन्स दिला. महाअंतिम सोहळ्यातला हाच परफॉर्मन्स त्यांना विजेतेपद देऊन गेला. चार वर्षांपूर्वी ओम डान्स क्लासमध्ये दोघांची ओळख झाली. जेव्हा मी होणार सुपरस्टार कार्यक्रमाविषयी कळलं तेव्हा दोघांनीही या कार्यक्रमात सामील होण्याचं ठरवलं. नृत्यात वेगवेगळे प्रयोग सादर करत दोघांनीही अंतिम सोहळ्यात धडक मारली. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे दोघंही आनंदात आहेत.

Kutch च्या खाडीत दोन महाकाय जहाजांची समोरासमोर टक्कर; पाहा भीषण PHOTOs

नेहुलसाठी या स्पर्धेची मिळालेली रक्कम खूप महत्वाची आहे. अतिशय हालाखीच्या परिस्थितीत नेहुलच्या आईने त्याला आणि त्याच्या भावाला मोठं केलं. घराची संपूर्ण जबाबदारी त्याच्या आईच्या खांद्यावर आहे. पुण्यात एक छोटं पार्लर चालवून नेहुलची आई त्याचं आणि त्याच्या भावाचं स्वप्न पूर्ण करते आहे. मात्र कोरोनाच्या संकटामुळे पार्लर बंद झालं. उत्पन्नाचं एकमेव साधन बंद झाल्यामुळे घराचं आणि पार्लरचं भाडं देणं शक्य झालं नाही. या बक्षीसाच्या रकमेतून नेहूल त्याच्या आईला हातभार लावणार आहे. स्टार प्रवाहच्या मी होणार सुपरस्टार या कार्यक्रमामुळे दोघांनाही नवी ओळख मिळाली आहे.

First published: