Home /News /entertainment /

नेहा पेंडसेच्या घरी सुरू झाली लगीनघाई, पाहा संगीत सेरेमनीचे PHOTO

नेहा पेंडसेच्या घरी सुरू झाली लगीनघाई, पाहा संगीत सेरेमनीचे PHOTO

टीव्हीची सुपरहिट मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे 5 जानेवारीला लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

  मुंबई, 04 जानेवारी : टीव्हीची सुपरहिट मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे 5 जानेवारीला लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मराठी नंतर हिंदी टीव्ही मालिका ‘मे आय कम इन मॅडम’मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली नेहा तिचा बॉयफ्रेंड शार्दुल सिंहशी लग्न करत आहे. दोघं अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचं तिने मान्य केलं. याशिवाय शार्दुल सिनेसृष्टीतील नसल्याचंही नेहाने याआधी सांगितलं. नववर्षाच्या सुरुवातीला नेहा महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न करणार असल्याचं तिनं स्पष्ट केलं होतं. त्याप्रमाणे आता तिच्या लग्नाच्या आधीच्या विधी तिच्या मुंबईतल्या घरी सुरू झाल्या आहेत. सोशल मीडियावर सध्या नेहा पेंडसेच्या मेहंदी आणि संगीत सेरेमनीचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये तिनं मल्टीकलर फ्लोलर प्रिंटचा लेहंगा परिधान केला होता. हा फोटो नेहानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात ती पती शार्दुलसोबत दिसत आहे. त्यानं सुद्धा नेहाला मॅचिंग पेहराव केला आहे. या फोटोमध्ये ही जोडी खूपच गोड दिसत आहे. दोन मुलांची आई श्वेता तिवारी पुन्हा प्रेमात, दोन वेळा झालाय काडीमोड
   
  View this post on Instagram
   

  A little US before the big WE ❤️ 📸 @thecelebstories

  A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

  नेहा मागच्या वर्षी बिग बॉसच्या 12 व्या सीझनमध्ये दिसली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तिनं तिच्या लग्नाची घोषणा केली होती. मी माझ्या स्वप्नातल्या राजकुमाराशी लग्न करणार असल्याचं तिनं यावेळी सांगितलं होतं. नेहा म्हणाली, या सुंदर कुटुंबाची सदस्य होत असल्याचा मला खूप आनंद होत आहे. माझ्या आयुष्यातला हा सर्वात सुंदर क्षण आहे असं देखिल तिनं सांगितलं. VIDEO : ‘छपाक’मध्ये रणवीरचे पैसे? प्रश्न ऐकून चिडली दीपिका पदुकोण
  नेहानं मराठी मालिकांमधून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं होतं. त्यानंतर हिंदी मालिका 'मे आय कम इन मॅडम' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. याशिवाय तिनं नटसम्राट सारख्या यशस्वी मराठी सिनेमांमध्येही काम केलं आहे. नेहा मराठमोळ्या पद्धतीनंच लग्न करणार आहे. सर्व विधी मराठी पद्धतीने होतील. लग्नाच्या मुख्य विधींना मी नऊवारी साडी नेसण्याचा विचार करत आहे. असं काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत नेहानं सांगितलं होतं. कुशल पंजाबी आत्महत्या: वडिलांचा मोठा खुलासा, सांगितलं काय झालं होतं त्या रात्री
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Neha pendse

  पुढील बातम्या