मुंबई, 11 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा (Neha Sharma)चा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती व्यायाम करताना दिसत आहे. नेहाने स्वत: हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओला तिने कॅप्शन दिलं आहे. ‘चला जीम सुरू झाल्या ह्यापेक्षा जास्त चांगलं काहीच नाही. जीम सुरू झाल्यामुळे डोकं आणि शरीर दोन्ही चांगलं काम करतंय.’
जीम सुरू झाल्यामुळे नेहाला झाला आनंद
नेहाचा व्यायाम करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ 24 तासांमध्ये 14 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओवर नेहाचे फॅन्स अनेक कॉमेट्स करत आहेत. कोरोनामुळे गेल्या 6 महिन्यांपासून जीम बंद होत्या. आता हळूहळू बंद असलेल्या जीम, लोकल, शाळा सुरू होत आहेत. जीम सुरू झाल्यापासून वर्कआऊट करण्याचा आनंद नेहा शर्मा घेत आहे.
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये नेहा शर्माचं नाव घेतलं जातं. नेहाने आत्तापर्यंत 'तुम बिन 2', 'मुबारकां' आणि 'तानाजी' अशा चित्रपटांमध्ये काम केलं आहे. नेहा शर्मा सोशल मीडियावरही चांगलीच सक्रीय असते. नेहाचे इन्स्टाग्रामवर एक कोटींपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. नेहाच्या व्हिडीओ आणि फोटोंवर तिचे फॅन्स नेहमीच हटके कॉमेट्स करत असतात.