लग्न, घटस्फोट, व्हर्जिनिटी... लग्नानंतर चारच दिवसांनी नेहा पेंडसेनं दिली सर्व प्रश्नांची बोल्ड उत्तरं

लग्न, घटस्फोट, व्हर्जिनिटी... लग्नानंतर चारच दिवसांनी नेहा पेंडसेनं दिली सर्व प्रश्नांची बोल्ड उत्तरं

'लोक मला शार्दूलच्या घटस्फोटांविषयी विचारतात. पण घटस्फोटित व्यक्तीशी लग्न करण्यात गैर काय? मीसुद्धा कुठे व्हर्जिन आहे...' अशी बिनधास्त वक्तव्य नेहा पेंडसेनं लग्नानंतर चारच दिवसांनी दिलेल्या एका मुलाखतीत केली आहेत.

  • Share this:

मुंबई, 9 जानेवारी : मराठी अभिनेत्री आणि बिग बॉसमुळे रिअॅलिटी टीव्हीची स्टार झालेली नेहा पेंडसे हिचं चारच दिवसांपूर्वी लग्न झालं. तिचा पती शार्दूलसिंह बयास याचं हे तिसरं लग्न आहे. दोन वेळा घटस्फोट झालेल्या शार्दूलशी लग्न केल्याने नेहाबद्दल बरीच चर्चा झाली. या सगळ्याविषयीची बिनधास्त उत्तर नेहाने स्वतःच एका मुलाखतीत दिली. लग्नसोहळ्याला चारच दिवस झालेले असताना नेहाने ही मनमोकळी आणि बोल्ड उत्तरं दिली आहेत.

'मी कुठे व्हर्जिन होते?'

"माझ्या लग्नाची चर्चा आहे आणि लोक मला शार्दूलच्या घटस्फोटांविषयी विचारतात. पण घटस्फोटित व्यक्तीशी लग्न करण्यात गैर काय? मीसुद्धा कुठे व्हर्जिन आहे...", असं नेहा म्हणते.

आजकाल प्राधान्यक्रम बदलल्यामुळे करिअरमुळे लोक उशीरा लग्न करतात. अनेकांना कमिटमेंट नको असते. पण लग्नाआधी एकापेक्षा अधिक जणांशी रिलेशनशिपमध्ये असतात. रिलेशनशिपमध्येही तेवढीच ओढ, प्रेम, एकनिष्ठा असते फक्त त्यावर कायदेशीर शिक्कामोर्तब झालेला नसतो. शार्दूलने तर प्रेम असणाऱ्या व्यक्तीबरोबर लग्न केलं. काही कारणानं नातं तुटलं. माझं नातं तर लग्न होण्याअगोदरच तुटलं होतं..." नेहा सांगते.

शार्दूलची कमिटमेंट मोठी

"दोन वेळा लग्न मोडूनही शार्दूलने माझ्याशी लग्न करण्याला प्राधान्य दिलं. दोन वेळा वाईट अनुभव असताना तिसऱ्यांदा असा विश्वास ठेवणं सोपं नसतं. पण शार्दूलची कमिटमेंट मोठी आहे", नेहा म्हणते. "शार्दूलच्या पूर्वायुष्याबद्दल लपवून ठेवलं नाही. आम्ही एकमेकांना आपापल्या भूतकाळासह स्वीकारलं आहे", असंही ती म्हणाली.

---------

अन्य बातम्या

33 सेकंदात झाला 180 प्रवाशांचा मृत्यू! समोर आला युक्रेन विमान क्रॅशचा VIDEO

प्रेमभंगाची धक्कादायक आकडेवारी समोर, दररोज 4 मुलं करतात आत्महत्या

कंडोम्स आणि सेक्स टॉइजचे हे VIRAL PHOTO खरंच JNU गर्ल्स हॉस्टेलवर सापडले का?

लग्नानंतरच्या बॅड पॅचबद्दल बोलली काजोल; सांगितलं वैयक्तिक आयुष्यातलं दुःख

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 9, 2020 06:16 PM IST

ताज्या बातम्या