मुंबई, 29 नोव्हेंबर: मराठमोळी फिटनेसफ्रिक अभिनेत्री नेहा पेंडसेचा वाढदिवस (Neha Pendse Birthday) आज (29 नोव्हेंबर) आहे. ती 37 वर्षांची झाली आहे. नेहाने पती शार्दूलसोबत खास पद्धतीने वाढदिवस साजरा केला आहे. याचा सुंदर व्हिडिओ तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. पती शार्दूलने सर्वांसमोर असं काही केले ज्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
नेहाने पती शार्दूलसोबत खास अंदाजात वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसाचा व्हिडिओ तिनं इन्स्टावर शेअर केला आहे. ती यावेळी खूपच आनंदात दिसत आहे. यावेळी डान्स व मस्तीच्या मुडमध्ये दिसली. केक कापण्यापूर्वी तिनं पतीला सर्वांसमोर किस केले व नंतर शार्दूलने देखील तिला किस केले व दोघांनी मिळून केका कापला. यावेळी तिच्या चेहऱ्यावरचा आनंद दिसत होता. ती या पार्टी वेअर ड्रेसमध्ये खूपच छान दिसत होती. चाहत्यांकडून देखील तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
वाचा : पहिल्या शेवंताच्या तुलनेत नव्या अभिनेत्रीत काय आहे खास? UK मधून शिक्षण आणि...
नेहा पेंडसेनं 5 जानेवारी 2020 रोजी आपला प्रियकर शार्दूल सिंहशी लग्न केलं होतं. पुण्यामध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीनं दोघांचं लग्न (Maharashtrian wedding) झालं होतं. लग्नात तिनं नऊवारी साडीदेखील नेसली होती. शार्दूलचे यापूर्वी दोन विवाह आणि घटस्फोट झाले (Divorcee) असल्याचा आणि त्याला दोन मुली असल्याचा खुलासा लग्नानंतर झाला होता. यामुळं नेहाचे चाहते प्रचंड नाराज झाले होते. त्यांनी सोशल मीडियावर तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं होतं.
View this post on Instagram
नेहा आणि शार्दूलची लव्हस्टोरी
नेहा आणि शार्दूलची लव्हस्टोरी (Neha-Shardul Lovestory) एका पार्टीपासून सुरू झाली होती. कामानिमित्त दोघांनी एकमेकांचे मोबाइल नंबर एक्स्चेंज केले. दोघांची पहिल्यांदा ओळख झाली तेव्हा शार्दूल 'प्रायमस' नावाच्या को-वर्किंग कन्सेप्टवर काम करत होता. नेहा आपली ब्रँड अॅम्बेसेडर व्हावी, अशी शार्दुलची इच्छा होती. नेहानं ती ऑफर स्वीकारली आणि ती प्रायमसची ब्रँड अॅम्बेसेडर बनली. नेहाला पहिल्या भेटीतच शार्दूल आवडला होता; पण तिनं आपल्या प्रेमाची कबुली दिली नव्हती. शार्दूलने मात्र जास्त उशीर न करता तिसऱ्या भेटीमध्ये नेहाला प्रपोज केलं होतं.
वाचा : ब्लॅक शिमरी आउटफिटमध्ये Janhvi Kapoor दिसली बोल्ड अंदाजात, पाहा PHOTO
नेहानं शार्दूलसोबत आपल्या पूर्वीच्या ब्रेकअपविषयीच्या गोष्टी शेअर केल्या होत्या, तर शार्दूलनंही त्याच्या घटस्फोटाशी संबंधित गोष्टी नेहाला सांगितल्या होत्या. शार्दूलला दोन मुली असल्याचीही माहिती नेहाला होती. असं असूनही दोघांनी एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. प्रत्यक्ष लग्नापूर्वी दोघं एक वर्ष लिव्ह-इनमध्ये (Live-in) राहत होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.