लग्नानंतर नेहा पेंडसेचा गौप्यस्फोट, नवऱ्याचं तिसरं लग्न आणि दोन मुलांचा बाप

लग्नानंतर नेहा पेंडसेचा गौप्यस्फोट, नवऱ्याचं तिसरं लग्न आणि दोन मुलांचा बाप

लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी दिलेल्या मुलाखतीत नेहानं तिच्या पतीबद्दल अनेक गौप्यस्फोट केले आहेत.

  • Share this:

मुंबई, 08 जानेवारी : मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे 05 जानेवारीला लग्नाच्या बेडीत अडकली. उद्योगपती शार्दुल सिंहसोबत नेहानं मराठमोळ्या पद्धतीनं लग्नगाठ बांधली. तिच्या लग्नाचे फोटो आणि सोशल मीडियावर खूप व्हायरलही झाले. खास करुन तिनं लग्नात घेतलेला उखाणा चर्चेचा विषय ठरला होता. पण नेहाचा पती शार्दुल सिंह नक्की आहे तरी कोणी याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना होती. दरम्यान लग्नानंतर एका इंग्रजी वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत नेहानं तिच्या पतीबद्दल अनेक गौप्यस्फोट केले आहेत. जे ऐकल्यावर तिच्या चाहत्यांना धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.

लग्नानंतर दिलेल्या एक मुलाखतीत नेहानं तिच्या आणि शार्दुलच्या लव्ह लाइफपासून ते लग्नापर्यंतच्या अनेक गोष्टींचा खुलासा केला. याचवेळी तिनं तिचा नवऱ्याचं हे तिसरं लग्न असून तो 2 मुलींचा बाप असल्याचा धक्कादायक खुलासाही केला आहे. नेहा म्हणाली, शार्दुलला भेटण्याआधी माझे 2-3 रिलेशिप झाले. मात्र ती नाती फार काळ टिकू शकली नाहीत. त्यानंतर मला शार्दुल भेटला. शार्दुलचं हे तिसरं लग्न आहे आणि तो दोन मुलींचा बाप आहे. मला त्याच्या बद्दल सुरुवातीपासून सर्व माहित होतं आणि त्याच्या दोन्ही मुली खूप गोड आहेत.

JNU वाद : दीपिकाला राहुल गांधी पंतप्रधान झालेले पाहायचं होतं, जुना Video Viral

नेहा पेंडसेनं लग्नात घेतलेल्या भन्नाट उखाण्याचा व्हिडीओ तिचा मित्र अभिजित खांडकेकरनं त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. नेहानं घेतलेला उखाणा- चांदीच्या ताटात फणसाचे गरे... शार्दुलराव आहेत बरे... पण वागतील तेव्हा खरे...नेहाचा हा उखाणा ऐकल्यावर तिचा नवराही लाजला.

 

View this post on Instagram

 

नवरीचा उखाणा #yaarkishadi #shardulnehha #pune #maharastrianwedding

A post shared by Abhijeet Khandkekar (@abhijeetkhandkekar) on

नेहानं तिच्या लग्नात गुलाबी रंगाची पारंपरिक नऊवारी साडी नेसली होती. त्यावर डिझानर ब्लाऊस, नाकात नथ, गळ्यात महाराष्ट्रीयन पद्धतीचे पारंपरिक दागिने असा नेहाचा लुक सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. तिच्या लग्नाला बऱ्याच मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

दबंग 3च्या विलनवर सलमान खान फुल्ल टू इंप्रेस, डायरेक्ट गिफ्ट केली 2 कोटी कार

 

View this post on Instagram

 

वधू वरयो:शुभम भवतु सावधान

A post shared by NEHHA PENDSE BAYAS (@nehhapendse) on

नेहा मागच्या वर्षी बिग बॉसच्या 12 व्या सीझनमध्ये दिसली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तिनं तिच्या लग्नाची घोषणा केली होती. मी माझ्या स्वप्नातल्या राजकुमाराशी लग्न करणार असल्याचं तिनं यावेळी सांगितलं होतं. या सुंदर कुटुंबाची सदस्य होत असल्याचा मला खूप आनंद होत आहे. माझ्या आयुष्यातला हा सर्वात सुंदर क्षण आहे असं देखील नेहा म्हणाली होती. नेहानं मराठी मालिकांमधून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं होतं. त्यानंतर हिंदी मालिका 'मे आय कम इन मॅडम' या मालिकेतून ती घराघरात पोहोचली. याशिवाय तिनं नटसम्राट सारख्या यशस्वी मराठी सिनेमांमध्येही काम केलं आहे.

दीपिकानंतर मराठी स्टारही उतरले मैदानात, JNU हल्ल्याचा केला निषेध

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 8, 2020 12:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading