'बिग बाॅस 12'मध्ये झळकणार एक मराठी अभिनेत्री

यावेळी बिग बॉसच्या घरात जोड्यांना एन्ट्री दिली जाणार आहे. पण बिग बाॅस 12मध्ये एक मराठमोळा चेहरा असणार आहे, अशी चर्चा आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 2, 2018 05:50 PM IST

'बिग बाॅस 12'मध्ये झळकणार एक मराठी अभिनेत्री

मुंबई, 2 सप्टेंबर : बिग बॉसच्या 12व्या सीझनची सध्या प्रचंड चर्चा आहे. यंदा या सीझनमध्ये कोण सहभागी होणार याची नाव अजूनही जाहीर होतच आहेत. रियॅलिटी शोजमध्ये लोकप्रिय असलेला बिग बॉस पुन्हा एक नवीन सिझन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये येणारा बिग बॉसचा शो यावर्षी मात्र एक महिनापूर्वीच येत आहे. यावर्षी १२वा सिझन असल्याने 15सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. प्रत्येक वेळेस या कार्यक्रमाची एक नवीन थीम ठेवली जाते. यावर्षीची थीमसुद्धा अशीच नवीन आणि रंजक असणार आहे. यावेळी बिग बॉसच्या घरात जोड्यांना एन्ट्री दिली जाणार आहे. पण बिग बाॅस 12मध्ये एक मराठमोळा चेहरा असणार आहे, अशी चर्चा आहे.

नव्या सीझनमध्ये अजून एक मराठी चेहरा या घरात दिसणारे आणि त्याचं नाव आहे नेहा पेंडसे. हिंदी मालिकांद्वारे आपल्या करिअरची सुरूवात केलेली नेहा सध्या पुन्हा एकदा हिंदीतच रमलीये. त्यामुळे बिग बॉसच्या घरात जाऊन ती नक्की काय धमाल करते ते पाहणं मोठं इटरेस्टिंग ठरणारे. यंदा हा शो लोणावळ्याऐवजी गोव्यात होणार असल्याचंही समजतंय.

शिल्पा शिंदेनंही गेल्या वेळी बिग बाॅसमध्ये विजेतेपद पटकावलं होतं. आता नेहा काय करतेय, हे पाहायचं.

यावेळी या घरात काही रिअल लाईफ जोड्या एकत्र दिसतील असं आधीच जाहीर करण्यात आलंय. यात तीन जोड्या या सेलिब्रिटीज असतील तर तीन सर्वसामान्य असतील. मात्र घरात जाणाऱ्या या जोड्या चांगल्याच मालामाल होणारेत. यात आसामी अभिनेत्री माहिका शर्मा आणि तिचा परदेशी बॉयफ्रेंड डॅनी डी ही सगळ्यात जास्त मानधन मिळवणारी जोडी ठरणारे. या दोघांना शोमध्ये सहभागी होण्यासाठी आठवड्याचे 95 लाख रूपये मिळणारेत. डॅनी हा अडल्ट स्टार असून सध्या तो माहिकाला डेट करतोय. डॅनी एका प्राॅडक्शन हाऊसचा मालक आहे. त्याच्याकडे 7 हेलिकाॅप्टर्स आहेत.

Loading...

PHOTOS : बिग बींच्या लेकीनं उघडलं फॅशन स्टोअर, कोणी कोणी लावली हजेरी?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2018 05:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...