News18 Lokmat

परीच्या जीवाला धोका, 'नकळत सारे घडले'मध्ये आणखी एक ट्विस्ट

निरागस हास्य आणि बडबड्या स्वभावाने प्रत्येकालाच लळा लावणारी परी मृत्यूशी झुंज देतेय. परीच्या या अवस्थेला कारणीभूत आहे खुद्द नेहा.

News18 Lokmat | Updated On: Oct 4, 2018 09:46 AM IST

परीच्या जीवाला धोका, 'नकळत सारे घडले'मध्ये आणखी एक ट्विस्ट

मुंबई, 04 आॅक्टोबर : रांगडे पाटील कुटुंबावर संकटांची मालिका अखंड सुरूच आहे. एकीकडे मेधाची कटकारस्थानं संपतात न संपतात तोच आता सर्वांच्या लाडक्या परीचा जीव धोक्यात आलाय. निरागस हास्य आणि बडबड्या स्वभावाने प्रत्येकालाच लळा लावणारी परी मृत्यूशी झुंज देतेय. परीच्या या अवस्थेला कारणीभूत आहे खुद्द नेहा. परीला पोटच्या मुलीप्रमाणे वाढवणाऱ्या, तिच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या नेहाकडून एक अक्षम्य चूक झालीय.

परीच्या आजारपणात नेहाने तिच्यावर चुकीचे औषधोपचार केलेत. नेहाकडून झालेल्या या चुकीची शिक्षा निष्पाप परीला भोगावी लागणार आहे. डॉक्टर परीला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत, पण डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश मिळेल का? परीचा जीव वाचेल का? या कठीण प्रसंगाचा सामना नेहा कशी करणार?

काही दिवसांपूर्वीच प्रिन्स आणि मेधाचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. नव्याचे नऊ दिवस ओसरत नाहीत तोच मेधाने आता आपले रंग दाखवायला सुरुवात केलीय. मेधाने हे लग्न रांगडे पाटलांना धडा शिकवण्यासाठी आणि पैश्यांच्या हव्यासापोटी केलंय. घरातल्या प्रॉपर्टीवर डोळा असणाऱ्या मेधाच्या मनसुब्यात नेहा अडथळा ठरतेय. मेधाच्या गुप्त हालचालींवर नेहा लक्ष ठेवून आहे, आणि नेमकी हीच गोष्ट मेधाला खटकतेय. त्यामुळेच नेहाचा काटा काढण्याचं तिने ठरवलंय.

‘प्रेमा तुझा रंग कसा’च्या पहिल्या सीझनमध्ये प्रेमकथांतून घडणारे गुन्हे आणि त्यांचा तपास दाखवण्यात आला. या सीझनमध्येही प्रेमाची अनेक रंगरूपं पाहायला मिळतायत. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक गुन्ह्यांच्या घटनांविषयी आपण ऐकत असतो, वाचत असतो. ‘प्रेमा तुझा रंग कसा’ ही मालिका समाजात घडणाऱ्या याच घटनांविषयी जागरुक करण्याचा प्रयत्न करतोय.

बिग बाॅसमध्ये राहिलेल्या 'या' अभिनेत्रीने शेअर केलेले बिकनीतले फोटो व्हायरल

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 4, 2018 09:46 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...