Home /News /entertainment /

नेहा कक्करचं बहुचर्चित गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला; प्रदर्शित होताच VIDEO ट्रेंडमध्ये

नेहा कक्करचं बहुचर्चित गाणं अखेर प्रेक्षकांच्या भेटीला; प्रदर्शित होताच VIDEO ट्रेंडमध्ये

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्करचं (Neha Kakkar) खयाल रखा कर (Khayal Rakha Kar) हे गाणं प्रदर्शित झालं आहे. प्रदर्शित होताच काही तासातच हे गाणं ट्रेडिंगमध्ये आलं आहे.

    मुंबई,22 डिसेंबर: बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर (Neha Kakkar) एका फोटोमुळे चर्चेत आली होती. या फोटोमध्ये नेहा तिचा नवरा रोहनप्रीतसोबत (Rohanpreet) दिसली होती. त्या फोटोत दिसणाऱ्या बेबी बम्पमुळे तिच्या गरोदरपणाची चर्चा सुरू होती. पण ती प्रेग्नंट नसून तिच्या नव्या गाण्याच्या प्रमोशनसाठी तिने हा फंडा वापरला असल्याचं नंतर दिसून आलं. त्यावरुन काही जणांनी तिला ट्रोलही केलं होतं. ज्या मुझिक व्हिडीओसाठी नेहाने एवढा खटाटोप केला होता तो व्हिडीओ प्रदर्शित झाला आहे. ‘खयाल रखा कर’ या नव्या गाण्यामध्ये ती रोहनप्रीतसोबत दिसून येत आहे. काय आहे व्हिडीओमध्ये? नेहा कक्करच्या खयाल रखा कर या गाण्यामध्ये एक छानशी प्रेमकहाणी दाखवण्यात आली आहे. लहानपणापासूनचे मित्र ते एकमेकांचे जोडीदार असा सुंदर प्रवास यामध्ये रंगवण्यात आला आहे. त्यानंतर एक भन्नाट ट्विस्टही पाहायला मिळतो. या गाण्याला आत्तापर्यंत 1 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. नेहाचं नवं गाणं सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. नेहा कक्करच्या प्रेग्नेंसीवर अनेक चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. नेहा आणि रोहनप्रीत दोन महिन्यांपूर्वीच 24 ऑक्टोबर रोजी लग्नबंधनात अडकले. त्यामुळे केवळ चाहतेच नाही, तर अनेक युजर्सही कमेंट करून नेहाच्या प्रेग्नेंसीवर आश्चर्य व्यक्त करत होते. नेहा आणि रोहनप्रीतच्या लग्नाचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर हनिमूनसाठी दोघे दुबईला गेल्याचे फोटोही व्हायरल झाले होते.
    Published by:Amruta Abhyankar
    First published:

    Tags: Neha kakkar

    पुढील बातम्या