Home /News /entertainment /

लग्नानंतर नेहा कक्करचा 'First Kiss' बघितलात का? VIDEO पाहून नेटकरी म्हणाले...

लग्नानंतर नेहा कक्करचा 'First Kiss' बघितलात का? VIDEO पाहून नेटकरी म्हणाले...

नेहा कक्करच्या (Neha Kakkar) गाण्याचे विडिओ नेहमीच सोशल मीडियावर (Social Media) वायरल होताना असतात. पण सध्या नेहाच्या लग्नानंतर पहिल्यांदाच नेहाचा 'First Kiss' सोशल मीडिया वर वायरल होत आहे.

  मुंबई, 06 डिसेंबर: नेहा कक्कर (Neha Kakkar) कायमच सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच अ‍ॅक्टिव्ह असते. इंस्टाग्रामवर (Instagram) तिचे 5 कोटीच्या जवळपास फॉलोवर्स (Followers) आहेत. नेहा तिच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट तिच्या सोशल मीडिया पेज वरून देताना दिसते. एक महिन्यापूर्वीच नेहा सिंगर रोहनप्रीत सिंह (Rohanpreet Singh) बरोबर लग्न बंधनात अडकली असून तिने तिच्या लग्नाचे फोटो तिच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केले होते. आता लग्नानंतर पहिल्यांदाच नेहाने तिच्या 'फर्स्ट किस' (First Kiss) चा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. नेहाच्या या व्हिडीओला आतापर्यंत 9लाखांपेक्षा अधिक लाईक्स (Likes) मिळाले असून 5000 च्या जवळपास कॉमेंट्स (Comments) आल्या आहेत. नेहाचा हा व्हिडीओ बघून रॅपर हनी सिंहने (Yo Yo Honey Singh) 'लव्ह अँड थँक्स' अशी कंमेंट तिच्या व्हिडीओवर केली आहे. तसेच खुद्द नेहाचा नवरा रोहनप्रीतनेदेखील शोना बाबू अशी कॉमेंट नेहाच्या या पोस्टवर केली आहे. या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलं आहे. तर काहींनी तिची खिल्ली उडवली.
  नेहा कक्करने शेअर केलेल्या या व्हिडिओत नेहा हनी सिंहचं गाणं 'फर्स्ट किस' वर लिपसिंग (Lipsing) करताना दिसून येत आहे. नेहाच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. नेहा कक्करचं लग्न होण्याआधी काही महिने नेहा आणि आदित्य नारायणाच्या (Aditya Narayan) रिलशनशिपबाबत चर्चा रंगात होत्या पण आता नेहाच्या लग्नापाठोपाठच 1 डिसेंबरला आदित्यदेखील श्वेता अग्रवाल (Shweta Agrawal) बरोबर लग्न बंधनात अडकला. आदित्यच्या लग्नातला त्याचा त्याच्या बायको श्वेताला किस करतानाच फोटो सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला होता.आता त्या पाठोपाठच नेहाचा हा लग्नानंतरच्या 'फर्स्ट किस' च्या विडिओला नेटकर्यांकडून जोरदार पसंती मिळताना दिसत आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Bollywood, Singer

  पुढील बातम्या