मुंबई, 20 ऑक्टोबर : गायक नेहा कक्कर (neha kakkar) आणि रोहनप्रीत सिंग (rohanpreet singh) यांचं लग्न खरंच होणार की नाही यावर चर्चा सुरू होती. मात्र आता खरंच यांचं लग्न पक्कं झालं आहे. दोघांच्याही रोक्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंगने आपल्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघंही एकाच रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे.
मंगळवारी नेहा कक्करचा रोका झाला. नेहा आणि रोहनप्रीतचे पहिलं एकत्र गाणं असणारा व्हिडीओ उद्या 21 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 'Nehu da Vyah' असं या गाण्याचं नाव आहे. त्याआधी नेहाच्या रोक्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामुळे काहींना हा प्रमोशनसाठी केलेला स्टंट वाटतो आहे, तर काही चाहते नेहाच्या रिलेशनशिप मुळे आनंदात आहेत.
हा व्हिडीओ शेअर करताना नेहाने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे, "उद्या Nehu da Vyah रिलीज होणार आहे. तोपर्यंत माझ्या चाहत्यांसाठी हे छोटंसं गिफ्ट. आमच्या रोको सेरेमनीची ही क्लिप" या कॅप्शनमध्ये तिनं रोहनप्रीतवर खूप प्रेम करत अशल्याचं सांगितलं आहे, तसंच त्याच्या आई-वडिलांना आई-बाब म्हणत त्यांचे आभारही मानले आहेत.
हे वाचा - ट्विटवरवर DDLJ फिव्हर; शाहरूख-काजोलऐवजी आले राज-सिमरन; चाहत्यांसाठी स्पेशल Emoji
दरम्यान नेहा आणि रोहनप्रीतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता. जो तिच्या रोक्याचा असल्याचं सांगितलं जात होतं. या व्हिडीओत नेहा आणि रोहनप्रीत एकमेकांचे हात पकडून बसले आहेत. बॅकग्राऊंडला एक रोमँटिक गाणं सुरू आहे. हा व्हिडीओ त्यांच्या रोक्याचा असल्याची चर्चा सुरू झाली. Viral Bhayani ने देखील हा व्हिडीओ नेहाच्या रोक्यामधील असल्याचे म्हटले आहे. त्यावर स्वतः नेहाने कमेंट करून म्हटले आहे की, 'Viral हा माझ्या रोक्याचा व्हिडीओ नाही आहे'.
View this post on InstagramThe day he made me meet His Parents and Family ♥️ Love You @rohanpreetsingh #NehuPreet
नेहाने हा व्हिडीओ शेअर करत, रोहनने जेव्हा आपल्याला कुटुंबियांना भेटवलं तेव्हाचा हा व्हिडीओ असल्याचं तिनं कॅप्शनमध्ये म्हटलं.
हे वाचा - अमृता रावच्या घरी थोड्याच दिवसात येणार 'नवा पाहुणा', शेअर केला Baby Bumpचा फोटो
याआधी नेहा-रोहनप्रीतच्या लग्नाची पत्रिकादेखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. 24 ऑक्टोबरला दिल्लीत त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे, असं सांगितलं जातं आहे. शिवाय त्याच्या दोन दिवस आधीच म्हणजे 22 ऑक्टोबरला ते कोर्ट मॅरेज करणार असल्याचीही माहिती मिळते आहे. 26 ऑक्टोबरला पंजाबमध्ये लग्नाचं रिसेप्शन ठेवलं जाणार आहे.