Nehu Da Vyah : अखेर नेहा कक्करने दिला लग्नाला होकार! रोहनप्रीत बरोबरचं गाणं सोशल मीडियावर हिट

Nehu Da Vyah : अखेर नेहा कक्करने दिला लग्नाला होकार! रोहनप्रीत बरोबरचं गाणं सोशल मीडियावर हिट

बॉलिवूड (Bollywood) सिंगर नेहा कक्कर (Neha Kakkar) आणि रोहनप्रीत सिंह (Rohanpreet Singh)यांचं लवकरच लग्न होणार आहे. नेहाचा मोस्ट अवेटेड म्युझिक व्हिडीओ रीलिज झाला आहे. यात तिच्या आणि रोहनप्रीतच्या लव्हस्टोरीचा प्रवास दाखवण्यात आला आहे. तुम्हीही पाहा या खास व्हिडीओची एक झलक.

  • Share this:

मुंबई 21ऑक्टोबर:  बॉलिवूड (Bollywood)  सिंगर नेहा कक्कर (Neha Kakkar) सध्या तिच्या लव्ह लाईफमुळे चांगलीच चर्चेत आहे. तिचा होणारा नवरा म्हणजेच हॉट पंजाबी मुंडा रोहनप्रीत सिंह (Rohanpreet Singh)यांच्या लग्नाच्या सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. यातच नेहा कक्करच्या नव्या गाण्याचा व्हिडीओ रीलिज झाला आहे. नेहू दा व्याह (Nehu Da Vyah) असं या म्युझिक व्हिडीओचं नाव आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

'नेहू दा व्याह' या गाण्यामध्ये नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंहच्या आत्तापर्यंतच्या जर्नीला दाखवण्यात आलं आहे. नेहा आणि रोहनप्रीतने या म्युझिक व्हिडीओचं जबरदस्त प्रमोशन केलं आहे. नुकताच नेहा कक्करने नुकताच आपल्या रोका सोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

काही दिवसांपूर्वी नेहा कक्करचं लग्न नक्की कधी होणार असा प्रश्न विचारला जात होता. पण नेहाने स्वत: रोनहप्रीत आणि तिच्या नात्याची माहिती दिली. आणि सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला.

याआधी नेहा-रोहनप्रीतच्या लग्नाची पत्रिकादेखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. 24 ऑक्टोबरला दिल्लीत त्यांचा विवाहसोहळा पार पडणार आहे, असं सांगितलं जातं आहे. शिवाय त्याच्या दोन दिवस आधीच म्हणजे 22 ऑक्टोबरला ते कोर्ट मॅरेज करणार असल्याचीही माहिती मिळते आहे. 26 ऑक्टोबरला पंजाबमध्ये लग्नाचं रिसेप्शन ठेवलं जाणार आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 21, 2020, 1:05 PM IST

ताज्या बातम्या