आदित्य नारायण या मुलीशी करणार लवकरच लग्न, नेहा कक्करनं केला खुलासा

काही काळापूर्वी नेहा आणि आदित्य नारायणसोबत लग्न करणार अशी चर्चा होती.

काही काळापूर्वी नेहा आणि आदित्य नारायणसोबत लग्न करणार अशी चर्चा होती.

 • Share this:
  मुंबई, 23 फेब्रुवारी : बॉलिवूड प्लेबॅक सिंगर नेहा कक्कर मागच्या काही काळापासून तिच्या खासगी आयुष्यामुळे खूप चर्चेत आहे. काही काळापूर्वी ती आदित्य नारायणसोबत लग्न करणार अशी चर्चा होती. मात्र नंतर हा केवळ कार्यक्रमाचा टीआरपी वाढवण्यासाठी केलेला खटाटोप होता हे समोर आलं. पण आता नेहानं स्वतःच आदित्य नारायण कोणाशी लग्न करणार याचा खुलासा केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत नेहा म्हणाली, आदित्य खूप चांगला मुलगा आहे. त्याचं मन अगदी सोन्यासारखं आहे आणि मला हे सांगताना आनंद होत आहे की आदित्य लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. माझा प्रिय मित्र याच वर्षी त्याच्या लॉन्ग टर्म गर्लफ्रेंडशी लग्नाची गाठ बांधणार आहे. मी त्यांच्या सुखासाठी आणि ते दोघं आयुष्यभर एकत्र राहावे अशी प्रार्थना करते. माझ्यासाठी आदित्य एका चांगल्या मित्राव्यतिरिक्त जास्त काहीही नाही. एलईडी पॅंट परिधान करून पार्टीत थिरकली अनन्या पांडे, VIDEO व्हायरल
   
  View this post on Instagram
   

  #IndianIdol11 Finale ❤️ Aaj Raat Tonight at 8 pm. Only on @sonytvofficial 😎 . @thecontentteamofficial

  A post shared by Neha Kakkar (@nehakakkar) on

  काही दिवसांपूर्वी आदित्यनं एका मुलाखतीत त्याचं नेहाशी लग्नाचं वृत्त केवळं अफवा असल्याचं सांगितलं होतं. इतकंच नाही तर या दोघांमध्ये होणारं फ्लर्टिंग सुद्धा या शोचा एक भाग असल्याचं त्यानं सांगितलं होतं. याशिवाय या दोघांचं एक गाणं रिलीज झालं ज्यात या दोघांची रोमँटिक केमिस्ट्री पाहायला मिळाली होती. या दोघांचं गोवा बीच हे गाणं नेहाचा भाऊ टोनी कक्करनं कंपोज केलं होतं. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सिद्धांत चतुर्वेदीसह ‘हे’ सहाय्यक कलाकारही पडले मुख्य अभिनेत्यांवर भारी! 25 वर्षापूर्वी अशी दिसायची अभिनेत्री नीना गुप्ता, शेअर केला जुना फोटो
  First published: