News18 Lokmat

ब्रेकअपनंतर दारुच्या नशेत नेहा कक्करनं काय केलं पाहिलंत का ?

गायिका नेहा कक्कर ब्रेकअप नंतर आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 12, 2019 09:49 PM IST

ब्रेकअपनंतर दारुच्या नशेत नेहा कक्करनं काय केलं पाहिलंत का ?

मुंबई, 12 एप्रिल : बॉलिवूडची प्रसिद्ध पार्श्वगायिका नेहा कक्कर मागील काही दिवसांपासून तिच्या ब्रेकअपमुळे खूप चर्चेत आली होती. त्यानंतर सध्या एका व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमुळे ती चर्चेत आली आहे. या व्हिडिओमध्ये नेहा नशेच्या धुंदीत दिसत आहे. पण ही मजेची नशा आहे. खरंतर नेहा नशेत असल्याचा अभिनय करत असून यात नेहासोबत एंटरटेनर लिली सिंहसुद्धा दिसत आहे. या व्हिडिओमध्ये नेहा आणि लिली दारू पिण्याचा अभिनय करत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
 

Loading...

View this post on Instagram
 

Chadh Gayi #CocaCola!! @iisuperwomanii Sister from another Mister ♥️ . . #CocaColaTu @tonykakkar @tseries.official @tanishk_bagchi @mellowdofficial . #NehaKakkar #LillySingh


A post shared by Neha Kakkar (@nehakakkar) on

नेहा कक्करच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ड्रिंक म्हणून नेहा आणि लिलीनं मिनिएचर पिताना दिसत आहेत. पण हे प्यायल्यावर त्यांना नशा चढत नाही. त्यानंतर त्या दोघीही कोका कोला पितात आणि कोका कोलाच्या पहिल्याच घोटात त्यांना नशा चढते आणि या दोघीही हसत हसत जमिनीवर पडतात. यावेळी नेहा लिलीला तू खूप विनोदी आहेस असं म्हणताना दिसते.
याअगोदरही नेहा आणि लिलीनं एक व्हिडिओ शूट केला होता. हा व्हिडिओ लिलीनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये लिली नेहाचं 'सिटी बजाए...' गाणं गाताना दिसत आहे. जे खूप बेसूर आहे. त्यानंतर तेच गाणं अचानक सुरात ऐकू येतं आणि कॅमेरा फिरताच यामागचं सत्य समजतं. लिलीच्या मागे नेहा स्वतःचं गाणं स्वतः गात असते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 12, 2019 09:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...