ब्रेकअपमुळे नेहा कक्कर आहे दु:खी, सोशल मीडियावर दिली कबुली

ब्रेकअपमुळे नेहा कक्कर आहे दु:खी, सोशल मीडियावर दिली कबुली

गायिका नेहा कक्करचं नुकतच ब्रेकअप झाल्यामुळे ती दुखी आहे असल्याची कबुली तिने स्वत: दिली आहे.

  • Share this:

मुंबई, 06 जानेवारी : बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर ही सध्या दु:खात आहे. सेलिब्रिटी असले तरी दु:खं मात्र सारखीच असतात. ती दु:खात असल्याची कबुली आता खुद्द तिनेच दिली आहे. पण नेहा कक्करसारख्या गायिकेला नेमकं काय झालं असेल तर याबाबबत तिनेचं उलघडा केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून नेहा फारच त्रस्त झाली आहे. त्रस्त होण्यामागचं कारण म्हणजे तिचं बॉयफ्रेंड हिमांशू कोहलीसोबत झालेलं ब्रेकअप.  त्यामुळे तिला मानसिक त्रास होतं सहन करावा लागतो आहे. सध्या ती डिप्रेशनमध्ये असल्याची कबुली तिने सोशल मीडियावर दिली आहे.

नेहीनं तिचं दुखं आपल्या फॅन्ससोबत शेअर करतं. काही लोकांमुळे तिच्या अशा फेज मधून जावं लागतं अशा भावनाही तिने सोशल मीडियावर व्यक्त केल्या. नेहा कक्कर आणि हिमांशू कोहली यांच्या रिलेशनशिप बद्दल काही दिवसांपूर्वीच मीडियात चर्चा सुरू झाली होती.

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात त्यांचं ब्रेकअप झाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं. नेहानं हिमांशूसोबतचे सर्व फोटो डिलीट केले. हल्लीच एका मुलाखतीमध्ये नेहाला हिमांशूबद्दल प्रश्न विचाराला तर तिने ओळखत नसल्याचं सांगितलं.

नेहाने ब्रेकअपनंतर या पोस्टमध्ये लिहिलं होतं की, 'मला नव्हतं माहित या जगात एवढी वाईट माणसही आहेत. सगळं काही गमावून मी आता शुद्धीत आली आहे. मी माझं सर्वस्व दिलं पण मला त्याबदल्यात काय मिळालं हे मी सांगूही शकत नाही'

First published: January 6, 2019, 8:51 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading