मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

OMG! पाहा कशी दिसतेय नेहा कक्कर; 14 वर्षांपूर्वीचा पहिल्या ऑडिशनचा VIDEO VIRAL

OMG! पाहा कशी दिसतेय नेहा कक्कर; 14 वर्षांपूर्वीचा पहिल्या ऑडिशनचा VIDEO VIRAL

नेहा यांना नारळ पाणी प्यायला आवडतं.

नेहा यांना नारळ पाणी प्यायला आवडतं.

आपल्या ग्लॅमरस जीवनशैलीनं चाहत्यांना आश्चर्यचकित करणाऱ्या नेहा कक्करचा (neha kakkar) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ आहे नेहाच्या पहिल्या ऑडिशनचा. या व्हिडीओमधील नेहाची जिद्द आणि चिकाटी पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क.

पुढे वाचा ...
  • Published by:  Mandar Gurav
मुंबई, 11 फेब्रुवारी : नेहा कक्कर (neha kakkar) ही बॉलिवूडमधील सध्याची आघाडीची गायिका म्हणून ओळखली जाते. आपल्या सुरेल आवाजानं रसिकांना मंत्रमुग्ध करणारी ही गायिका गाण्यांसोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडीओ नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. आपल्या ग्लॅमरस जीवनशैलीनं चाहत्यांना आश्चर्यचकित करणाऱ्या नेहाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Neha Kakkar video viral) सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे. हा व्हिडीओ आहे नेहाच्या पहिल्या ऑडिशनचा (Neha Kakkar first audition in Indian idol). या व्हिडीओमधील नेहाची जिद्द आणि चिकाटी पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क. नेहा आज बॉलिवूडमधील एक लोकप्रिय गायिका म्हणून ओळखली जाते. तिने 2006 साली इंडियन आयडॉल या रिअॅलिटी शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. फेसबुकवर शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ नेहाच्या पहिल्या ऑडिशनचा आहे. त्यावेळी नेहा अकरावीत शिकत होती. ती बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय गायिका होण्याची स्वप्नं पाहत होती. अन् तिच स्वप्नं उराशी बाळगून तिनं इंडियन आयडॉलमध्ये एण्ट्री घेतली. पुढे पाहता पहाता सुरेल आवाजाच्या जोरावर तिनं इंडियन आयडॉलच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं. नेहाचा हा संपूर्ण सुरेल प्रवास या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आला आहे. हे वाचा -  'मी स्मिता पाटीलचा मुलगा आहे हे दाखवून देईन', प्रतीकनं आईसाठी केला ‘हा’ निश्चय नेहानं 2008 साली मिराबाई नॉटआऊट या चित्रपटात हे राम हे गाणं गाऊन आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिनं ब्लू, बाल गणेश, पंगा गँग यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली. नेहाला खरी लोकप्रियता मिळाली ती यारिया या चित्रपटातील सनी सनी या गाण्यामुळे. अन् त्यानंतर पुढील सहा वर्षात तिनं तब्बल 50 पेक्षा अधिक चित्रपटांसाठी सुरेल गाणी गायली आहेत.
First published:

Tags: Entertainment, Neha kakkar, Singer

पुढील बातम्या