मुंबई, 12 डिसेंबर: पाणीपुरी म्हणजे मुलींचा जीव की प्राण. पाणीपुरी खाण्याची संधी मुली शक्यतो सोडत नाहीत. मग यात आपली सेलिब्रिटी गायिका कशी मागे राहील. तुमच्या आमच्याप्रमाणेच नेहा कक्करलाही पाणीपुरी प्रचंड आवडते. पण या पाणीपुरीच्या मोहामुळेच तिचं नॅशनल टेलिव्हीजिजनवर हसं झालं आहे. त्याचं झालं असं की, नेहा कक्कर (Neha Kakkar) सध्या इंडियन आयडॉल (Indian Idol) या शोमध्ये जजच्या रुपात दिसत आहे. तिच्यासोबत विशाल ददलानी (Vishal Dadlani) आणि हिमेश रेशमियादेखील (himesh Reshammiya) आहेत. सेटवर एकमेकांची मजामस्ती करण्याची ते एकही संधी सोडत नाहीत.
...अन् नेहाची अशी गंमत केली
इंडियन आयडॉलच्या सेटवर हिमेश रेशमिया यांनी पाणीपुरी आणली होती. पाणीपुरी बघून नेहा कक्करच्या तोंडाला पाणी सुटलं. तिने ती पाणीपुरी खाऊन बघितली आणि क्षणभरात ती पाणीपुरी थुंकून टाकली. ती पाणीपुरी अतिशय कडू होती. त्यावर हिमेश रेशमिया आणि विशाल ददलानी यांनी तिला सांगितलं ही खास पाणीपुरी आहे. आपल्या फिटनेसासाठी बनवून आणली आहे. यामध्ये कारलं आणि कडूलिंबाच्या पानांचा रस आहे. हे ऐकून नेहा त्यांना म्हणाली, ‘तुम्ही जरा जास्तच फिटनेसच्या मागे लागला आहात असं वाटत नाही का तुम्हाला?’ पाणीपुरी खाल्ल्यानंतर नेहाची रिअॅक्शन पाहून सेटवरच्या कोणालाच हसू आवरलं नाही.
View this post on Instagram
नेहा कक्करचा हा व्हिडीओ तिच्या फॅनपेजवर सगळ्यात आधी पोस्ट करण्यात आला. आता तो चांगलाच व्हायरल होत आहे. नेहाच्या व्हिडीओला आत्तापर्यंत 97 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. लग्नानंतरही नेहा कक्कर जोरदार कामाला लागली आहे. तिचं कुली नंबर 1 चित्रपटातील गाणं प्रदर्शनाआधीच हिट झालं आहे.