नवरी नटली...! नेहा कक्करचा लग्नाच्या चुड्यातील VIDEO झाला व्हायरल

नवरी नटली...! नेहा कक्करचा लग्नाच्या चुड्यातील VIDEO झाला व्हायरल

नेहा कक्करचा लग्नाच्या चुड्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • Share this:

मुंबई, 08 फेब्रुवारी : बॉलिवूड प्लेबॅक सिंगर नेहा कक्कर आणि आदित्य नारायण यांच्या लग्नाची चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे. हे दोघंही येत्या 14 फेब्रुवारीला लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचंही बोललं जात आहे. याची घोषणाही या दोघांनी नॅशनल टेलिव्हिजनवर केली होती. इतकंच नाही तर आदित्यचे वडील गायक उदित नारायण यांनीही नेहाला आपली सून म्हणून मान्यता दिली होती. नेहा आणि आदित्यच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली असून आता नेहा कक्करचा लग्नाच्या चुड्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नेहा कक्करनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात नेहा एका कारमध्ये बसली आहे. तिने वेस्टर्न ड्रेस घातला आहे आणि तिच्या हातात लग्नात घातला जाणारा लाल चुडा दिसत आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राउंडला नेहानंच गायलेलं गाणं आहे, ‘याद पिया की आने लगी…’ याशिवाय नेहानं तिच्या इनस्टाग्राम स्टोरीवर एक फोटोही पोस्ट केला आहे ज्यात तिनं तिचा चेहरा आरश्याच्या मागे लपवला आहे. याला कॅप्शन देताना नेहानं लिहिलं, ‘शूट टाइम’. यावरुन समजतं की हा चुडा तिनं शूटिंगसाठी घातला आहे.

‘माझ्यासाठी प्रेम म्हणजे...’ कतरिनासोबतच्या नात्याबद्दल बोलला विकी कौशल

नेहा कक्कर आणि आदित्य नारायण येत्या 14 फेब्रुवारीला लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांचे गोव्यातील बीचवरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे हे दोघं गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करणार का अशी चर्चा सुरू होती. पण हे फोटो डेस्टिनेशन वेडिंगचे नाही तर नेहा आणि आदित्यच्या नवं गाणं गोवा बीचच्या शूटिंगचे फोटो होते. त्यांचं हे गाणं येत्या 10 फेब्रुवारीला रिलीज होत आहे. हे गाणं नेहाचा भाऊ टोनी कक्करनं कंपोज केलं आहे. या गाण्याचं शूट गोव्यात झालं असून याचे फोटो नेहा आणि आदित्य यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

नेहा-आदित्यच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात, एक्स बॉयफ्रेंडची पोस्ट VIRAL

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत उदित नारायण यांना नेहा आणि आदित्यच्या लग्नाबाबत विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना उदित नारायण म्हणाले, ‘नेहा खूपच गोड मुलगी आहे. मला ती आवडते आणि तिनं तिच्या करिअरमध्ये खूप नावही कमावलं आहे. विशेष म्हणजे नेहा आणि आदित्यची जोडी चांगली जमतेय. मला बाकी काही माहित नाही पण जर नेहा आमच्या घरची सून झाली तर मला खूप आवडेल. आमच्या घरात एक फिमेल सिंगर सहभागी होईल.’ इंडियन आयडॉलच्या होस्टिंग दरम्यान आदित्य नेहमीच नेहाशी फ्लर्ट करताना दिसतो. त्यामुळे नेहा आणि आदित्य खरंच 14 फेब्रुवारीला लग्न करणार की हा त्यांच्या प्रमोशनचा फंडा आहे याबाबतची उत्सुकता वाढली आहे.

अभिनेत्री हिना खानला त्रास देत असे अनोळखी तरूण, व्हिडीओ पाठवून म्हणायचा...

First Published: Feb 8, 2020 03:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading