नेहा कक्करच्या बेबी बंपच्या PHOTO मागचं सत्य आलं समोर; यासाठी केला होता खटाटोप

नेहा कक्करच्या बेबी बंपच्या PHOTO मागचं सत्य आलं समोर; यासाठी केला होता खटाटोप

नेहा कक्करचा (Neha Kakkar) बेबी बंम्प फ्लॉन्ट करतानाचा फोटो व्हायरल होत होता. या फोटोमागचं सत्य आता समोर आलं आहे.

  • Share this:

मुंबई,19 डिसेंबर: बॉलिवूड सिंगर नेहा कक्कर (Neha Kakkar) लवकरच आई होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. नेहा कक्करने इन्स्टाग्रामवर रोहनप्रीत सिंहसोबत (Rohanpreet Singh) एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोमध्ये नेहा बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत होती. नेहा कक्करच्या प्रेग्नंसीवर अनेक चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. नेहा आणि रोहनप्रीत दोन महिन्यांपूर्वीच 24 ऑक्टोबर रोजी लग्नबंधनात अडकले. त्यामुळे केवळ चाहतेच नाही, तर अनेक युजर्सही कॉमेंट करून नेहाच्या प्रेग्नंसीवर आश्चर्य व्यक्त करत होते. नेहाच्या या फोटोमागचा खरा अर्थ आता समोर आला आहे.

गाण्याच्या प्रमोशनसाठी प्रेग्नंसीचा स्टंट

नेहा खरोखर गर्भवती नसून तिने नव्या गाण्याच्या प्रमोशनसाठी हा फंडा वापरला असल्याचं दिसून येत आहे. नेहाने आता तिच्या नव्या गाण्यासंदर्भातला एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. रोहनप्रीत आणि नेहाचा आधीचाच फोटो यात दिसून येत आहे. ‘खयाल रखा कर’ या तिच्या नव्या गाण्याचं प्रमोशन ती सध्या करत आहे. नेहाने स्वत: हे गाणं गायलं आहे आणि या म्युझिक व्हिडीओमध्ये तिच्यासोबत रोहनप्रीतही झळकणार असल्याचं दिसून येत आहे. 22 डिसेंबर रोजी तिचा नवा म्युझिक व्हिडीओ रीलिज होणार आहे.

नेहा आणि रोहनप्रीतच्या लग्नाचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर हनिमूनसाठी दोघे दुबईला गेल्याचे फोटोही व्हायरल झाले होते. लग्न, हनिमून आणि आता नेहाच्या प्रेग्नंसीच्याही सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा सुरू झाल्या होत्या. पण हा एक प्रमोशनचा फंडा असल्याचं दिसून आलं आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: December 19, 2020, 1:31 PM IST

ताज्या बातम्या