नेहा-आदित्यचं लग्न झाल्यास उदित नारायण यांना होणार फायदा?

नेहा-आदित्यचं लग्न झाल्यास उदित नारायण यांना होणार फायदा?

नेहा कक्कर आणि होस्ट आदित्य नारायण यांच्यातील खुल्लम खुल्ला फ्लर्ट सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरत आहे.

  • Share this:

मुंबई, 18 जानेवारी : सिंगिंग रिअलिटी शो इंडियन आयडॉलमध्ये सध्या स्पर्धाकांपेक्षा जास्त चर्चा होतेय ती नेहा कक्करची. शो दरम्यान नेहा कक्कर आणि होस्ट आदित्य नारायण यांच्यातील खुल्लम खुल्ला फ्लर्ट सध्या सगळीकडेच चर्चेचा विषय ठरत आहे. काही दिवसांपूर्वीच आदित्यचे वडिल उदित नारायण यांनी पत्नीसोबत या शोमध्ये हजेरी लावली.

यावेळी या दोघांनीही नेहा कक्करला त्यांची भावी सून म्हणून पसंत केली. तर नेहा सुद्धा आदित्यच्या आईला ‘सासू माँ’ म्हणताना दिसली. शोच्या सेटवर जरी हे सर्व मस्करीच्या मुडमध्ये केलं गेलं असलं तरीही उदित नारायण यांनी मात्र नेहाला खरंच आपली सून म्हणून घरी आणण्याची तयारी दर्शवली आहे. यासोबतच त्यांनी यात आपला फायदाही शोधला आहे.

बाप-लेकीत कोण बेस्ट? 10 वर्षांनंतरच्या Love Aaj Kal वर सैफची ‘ही’ प्रतिक्रिया

नवभारत टाइम्सला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उदित नारायण यांना नेहा आणि आदित्यच्या लग्नाबाबत विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना उदित नारायण म्हणाले, ‘नेहा खूपच गोड मुलगी आहे. मला ती आवडते आणि तिनं तिच्या करिअरमध्ये खूप नावही कमावलं आहे. विशेष म्हणजे नेहा आणि आदित्यची जोडी चांगली जमतेय. मला बाकी काही माहित नाही पण जर नेहा आमच्या घरची सून झाली तर मला खूप आवडेल. आमच्या घरात एक फिमेल सिंगर सहभागी होईल.’

अ‍ॅमेझॉनच्या सीईओंसाठी शाहरुख खानने बदलला त्याचा सुपरहिट डायलॉग

एकूण काय तर नेहा आमि आदित्यचं लग्न झालं तर उदित नारायण यांचा फायदा होणार आहे. त्यांच्या घरातील फिमेल सिंगरची कमी पूर्ण होईल. उदित नारायण लवकरच सिंगिंग रिअलिटी शो सारेगमप लिटिल चॅम्पच्या नव्या सीझनमध्ये परीक्षकाचं काम पाहणार आहेत. या शोमध्ये त्यांच्यासोबत अलका याग्निक आणि कुमार सानू हे सुद्धा असणार आहेत. हे तिघंही त्यांच्या त्यांच्या काळात सुपरहिट ठरले होते.

पहचान कौन! हातात बॅट घेतलेला हा चिमुरडा आहे बॉलिवूडचा सगळ्यात मोठा स्टार

First published: January 18, 2020, 1:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading