VIDEO : नेहा आणि आदित्यने घेतली सप्तपदी, वाचा काय आहे सत्य

प्लेबॅक सिंगर नेहा कक्कर आणि आदित्य नारायण यांनी लग्न केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

प्लेबॅक सिंगर नेहा कक्कर आणि आदित्य नारायण यांनी लग्न केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

 • Share this:
  मुंबई, 13 फेब्रुवारी : इंडियन आयडल 11 ची जज नेहा कक्कर आणि होस्ट आदित्य नारायण यांच्या लग्नाच्या बातम्या हा सध्या चर्चेचा विषय आहे. 14 फेब्रुवारीला आदित्य आणि नेहा लग्न करणार असल्याच्या चर्चा होत्या. पण काही दिवसांपूर्वी आदित्यचे वडील उदित नारायण यांनी मात्र या सर्व अफवा असल्याचं म्हटलं होतं मात्र आता नेहा आणि आदित्य यांनी सप्तपदी घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर हा लग्नाचा व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये आदित्य हातात वरमाला घेऊन दिसत आहे. तर इंडियन आयडल 11 चे स्पर्धकही उपस्थित असल्याचं दिसत आहे. इतकचं नाही तर इंडियन आयडल 11चा जज हिमेश रेशमीयाची पत्नी सोनिया कपूरही यावेळी उपस्थित असल्याचं दिस आहे. या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमध्ये सर्वजण आदित्य आणि नेहासाठी आनंदी असल्याचंही दिसत आहे. प्रियांका-निकच्या घरी गुडन्यूज! नव्या पाहुण्याच्या स्वागतासाठी जोनस कुटुंब तयार
  आदित्य आणि नेहाच्या लग्नाची त्यांच्या चाहत्यांनाही उत्सुकता होती. मात्र नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत आदित्यचे वडिल उदित नारायण यांनी आदित्य आणि नेहाच्या लग्नाच्या चर्चा या निव्वळ अफवा असल्याचं म्हटलं होतं. इंडियन आयडल 11ला टीआरपी वाढवण्यासाठी हे केल्याचं त्यांनी सांगितलं. नक्कीच आदित्य आणि नेहाच्या लग्नाच्या चर्चांमुळे शोला चांगला टीआरपीही मिळाला. त्यामुळे आता व्हायरल होणारा आदित्य आणि नेहाचा हा व्हिडिओ नवा पब्लिसिटी स्टंट असू शकतो. उर्वशी रौतेलानं जिममध्ये उचललं 120 किलोचं वजन, सोशल मीडियावर VIDEO VIRAL
   
  View this post on Instagram
   

  All set for the wedding!!#adityanehakishaadi #AdityaNarayan #NehAditya #NehuWedsAdi #NehaKakkar #indianidol11

  A post shared by Neha Aditya (@_nehaaditya_) on

  नुकतचं नेहा आणि आदित्यचा एक म्युजिक अल्बम रिलीज झाला आहे. त्या अल्बमचं नाव गोवा बीच असं आहे. या म्युझिक व्हिडिओमध्ये नेहा कक्कर आणि तिचा भाऊ टोनी कक्कर याने गायलं आहे. या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.. या गाण्यात नेहा आणि आदित्यची रोमँटीक केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली आहे. आजारावर मात करत इरफान खानचं दमदार कमबॅक, पाहा Angrezi Medium Trailer नेहा कक्कर आणि आदित्य नारायण खऱ्या आयुष्यातही चांगले मित्र आहेत. त्यामुळे या लग्नाच्या व्हिडिओनंतर आता पुढे काय होणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.
  First published: