Indian Idol च्या सेटवर नेहा कक्कर झाली Oops Moment ची शिकार, सोशल मीडियावर Video Viral

Indian Idol च्या सेटवर नेहा कक्कर झाली Oops Moment ची शिकार, सोशल मीडियावर Video Viral

शोच्या ऑडिशनच्या वेळी एका स्पर्धकानं नेहाला जबरदस्तीनं किस करण्याचा प्रयत्न केल्यानं सोशल मीडियावर खूपच गोंधळ उडाला होता.

  • Share this:

मुंबई, 11 नोव्हेंबर : गायिका नेहा कक्कर मागच्या काही काळापासून डान्स रिअलिटी शो इंडियन आयडल शोमुळे चर्चेत आहे. या शोमध्ये नेहा सध्या परीक्षक म्हणून काम पाहत आहे. याशिवाय ती नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असते. मात्र यावेळी तिच्या चर्चेत येण्याचं कारण थोडं वेगळं आहे. ‘इंडियन आयडल’च्या मंचावर नेहा Oops Moment ची शिकार झाली आणि तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नेहा कक्कर याआधीही Oops Moment मुळे चर्चेत राहिली आहे. मात्र यावेळी तिच्यासोबत शो होस्ट आदित्य नारायण असल्यानं ती जास्त चर्चेत आली आहे. आदित्य सोबत डान्स करत असताना नेहा अचानक स्टेजवर पाय घसरुन पडली आणि त्यानंतर आदित्य अनेकदा तिची माफी मागताना दिसला. रविवारी टेलिकास्ट झालेल्या एपिसोडमध्ये नेहाला निधी कुमार या स्पर्धकानं त्याच्यासोबत डान्स करण्याची इच्छा बोलून दाखवली आणि त्यानंतर आदित्यनेही तिच्यासोबत डान्स करण्यासाठी विचारलं. आदित्य नेहासोबत हुबेहूब तिच्यासारखा डान्स करताना दिसत आहे. मात्र यावेळी नेहा गोल फिरुन आदित्यच्या जवळ जाते मात्र तो सांभळू शकत नाही आणि मग नेहा पाय घसरुन स्टेजवरच पडते.

बोनी कपूर यांच्या 'या' सवयीचा श्रीदेवींना यायचा राग, अनेकदा व्हायची भांडण!

शो सुरू झाल्यापासूनच नेहा काही ना काही कारणानं चर्चेत आहे. या शोच्या ऑडिशनच्या वेळी एका स्पर्धकानं तिला किस करण्याचा प्रयत्न केल्यानं सोशल मीडियावर खूपच गोंधळ उडाला होता. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरलही झाला होता. हा तिचा चाहता तिला भेटण्यासाठी खूप सारे गिफ्ट घेऊन आला होता. जेव्हा नेहा त्याला भेटायला गेली त्यावेळी त्यानं तिला मिठी मारत जबरदस्तीने किस करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर शो मेकर्सवर खूप टीका सुद्धा झाली.

Sooryavanshi: स्टंट करताना अपघात, जखमी झाला अक्षय कुमार

इंडियन आयडॉलचा हा 11 वा सीझन आहे. या शोमध्ये नेहा व्यतिरिक्त अनु मलिक आणि विशाल ददलानी हे सुद्धा परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. विशेष म्हणजे या शोच्या तिसऱ्या सीझनमध्ये नेहानं स्पर्धक म्हणून भाग घेतला होता.

Bigg Boss 13 : तुम्हीच माझे पहिले पती, 'बिग बॉस'वर राखी सावंतचा धक्कादायक आरोप

=======================================================================

नदीशेजारी उलटला रसायनानं भरलेला टँकर; पाण्यावर पांढऱ्या फेसाची चादर, पाहा VIDEO

Published by: Megha Jethe
First published: November 11, 2019, 11:46 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading