नेहा-आदित्यच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात, एक्स बॉयफ्रेंडची पोस्ट VIRAL

नेहा-आदित्यच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात, एक्स बॉयफ्रेंडची पोस्ट VIRAL

आदित्य नारायणसोबत लग्नाच्या चर्चा सुरू होण्याआधी नेहा कक्कर हिमांश कोहलीसोबत रिलेशनशिमध्ये होती.

  • Share this:

मुंबई, 08 फेब्रुवारी : बॉलिवूड प्लेबॅक सिंगर नेहा कक्कर आणि आदित्य नारायण यांच्या लग्नाची चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे. हे दोघंही येत्या 14 फेब्रुवारीला लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचंही बोललं जात आहे. याची घोषणाही या दोघांनी नॅशनल टेलिव्हिजनवर केली होती. इतकंच नाही तर आदित्यचे वडील गायक उदित नारायण यांनीही नेहाला आपली सून म्हणून मान्यता दिली होती. पण या सर्व चर्चांमध्ये आता नेहाच्या एक्स बॉयफ्रेंडची एक सोशल मीडियावर पोस्ट मात्र सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे आणि विशेष म्हणजे या पोस्टचं कनेक्शन नेहाच्या लग्नाशी जोडलं जात आहे.

आदित्य नारायणसोबत लग्नाच्या चर्चा सुरू होण्याआधी नेहा कक्कर हिमांश कोहलीसोबत रिलेशनशिमध्ये होती. या दोघांनी एका टीव्ही शोमध्येच त्यांच्या नात्याची कबुली दिली होती. पण काही काळानं या दोघांमध्ये मतभेद झाले आणि ते वेगळे झाले. मात्र त्यानंतर नेहा डिप्रेशनची शिकार झाली होती. अनेकदा ती तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून व्यक्त होतानाही दिसली. पण काही काळानं ती यातून बाहेर पडली आणि तिचं नाव आदित्य नारायणसोबत जोडलं जाऊ लागलं. सध्या नेहा आणि आदित्य लवकरच लग्न करणार असल्याचं बोललं जात आहे. पण त्याआधी या दोघांचं 'गोवा बीच' हे गाणं रिलीज होतं आहे.

मुलीची इच्छा असूनही संजय दत्तने तिला अभिनेत्री होऊ दिले नाही, कारण...

 

View this post on Instagram

 

3 Days left for #GoaBeach with @adityanarayanofficial . Song created by One Man Army @tonykakkar ❤️ featuring Cutie @kat.kristian in the video. Video Directed & Choreographed by Very Talented @piyush_bhagat @shaziasamji . Song on @desimusicfactory Label by Genius @anshul300 . Song out on 10th feb on the occasion of #ValentinesDay . Production Very well handled by @mirrorimagefilms @oneandonlysaad @rainbow_pegasus9

A post shared by Neha Kakkar (@nehakakkar) on

दरम्यान आता नेहाचा एक्स बॉयफ्रेंड हिमांश कोहलीची एक इन्स्टाग्राम पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्याचं कनेक्शन नेहाच्या लग्नाशी जोडलं जात आहे. हिमांशनं त्याच्या इन्स्टाग्राम त्याचा एक फोटो शेअर करत लिहिलं, ‘हे सर्व तुमच्या मेंदूत सुरू होतं आणि तिथेच संपतं. काहीही झालं तरीही आनंदी राहायला शिका.’ मागच्या काही काळापासून नेहा आणि आदित्यच्या लग्नाची चर्चा सुरू असतानाच हिमांशनं अशी पोस्ट शेअर केल्यानं त्याच्या या पोस्टचा संबंध नेटकरी आता नेहाच्या लग्नाशी जोडत आहेत. नेहाच्या लग्नाच्या चर्चांमुळे हिमांश डिस्टर्ब असल्याचं बोललं जात आहे.

Love Story: लग्नाआधी ‘लिव्ह इन’मध्ये होती ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अनिता दाते

काही दिवसांपूर्वी नवभारत टाइम्सला नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उदित नारायण यांना नेहा आणि आदित्यच्या लग्नाबाबत विचारण्यात आलं. यावर उत्तर देताना उदित नारायण म्हणाले, ‘नेहा खूपच गोड मुलगी आहे. मला ती आवडते आणि तिनं तिच्या करिअरमध्ये खूप नावही कमावलं आहे. विशेष म्हणजे नेहा आणि आदित्यची जोडी चांगली जमतेय. मला बाकी काही माहित नाही पण जर नेहा आमच्या घरची सून झाली तर मला खूप आवडेल. आमच्या घरात एक फिमेल सिंगर सहभागी होईल.’  इंडियन आयडॉलच्या होस्टिंग दरम्यान आदित्य नेहमीच नेहाशी फ्लर्ट करताना दिसतो. त्यामुळे हे वृत्त कितपत खरं आहे याची कोणतीही पुष्टी झालेली नाही.

काळा कोटवाला हिरो, ‘निकम’ आता मोठ्या पडद्यावर!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 8, 2020 11:45 AM IST

ताज्या बातम्या