मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

नेहा धुपियाच्या नवऱ्याने शेअर केला '5 गर्लफ्रेंड्स'बरोबचा फोटो, 'त्या' बोल्ड वक्तव्याचं केलं समर्थन

नेहा धुपियाच्या नवऱ्याने शेअर केला '5 गर्लफ्रेंड्स'बरोबचा फोटो, 'त्या' बोल्ड वक्तव्याचं केलं समर्थन

अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) तिच्या रोडीज (Rodies) या शोमधील आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सोशल मीडियावर खूप ट्रोल झाली आहे. दरम्यान अनेक बॉलिवूड कलाकारांनी तिला पाठिंबा दर्शवला असताना आता तिचा नवरा अंगद बेदी याने सुद्धा तिचं समर्थन केलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar
मुंबई, 16 मार्च : अभिनेत्री नेहा धुपिया (Neha Dhupia) तिच्या रोडीज (Rodies) या शोमधील आक्षेपार्ह वक्तव्यामुळे सोशल मीडियावर खूप ट्रोल झाली आहे. नेहा सध्या 'रोडीज रेव्हेल्यूशन'मध्ये टीम लीडर आहे. या शोमध्ये नेहानं एका कंटेस्टंटवर अशी काही कमेंट केली की त्यामुळे आता तिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल तर केलं गेलच पण आता तिला या घटनेबाबत स्पष्टीकरणही द्यावं लागलं आहे. तिच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी तिला फेक फेमिनिस्ट अशी उपाधी दिली होती. त्याचप्रमाणे खूप वाईट पद्धतीने तिला ट्रोल केलं होतं. (हे वाचा- ‘कहो ना...’ विसरून जाल, आता येणार ‘कोरोना प्यार हैं’) नेहा धुपियाच्या समर्थनार्थ आता खुद्द तिचा नवरा अंगद बेदी उभा राहिला आहे. त्याने इन्स्टाग्रामवर 5 फोटो अपलोड केले आहेत. 'या आहेत माझ्या 5 गर्लफ्रेंड. जे करायचं आहे ते कर', असं कॅप्शन देत ट्रोलर्सना आव्हान दिलं आहे. विशेष म्हणजे या 5 गर्लफ्रेंड कुणी वेगळ्या नसून त्याने नेहाबरोबरचे 5 वेगवेगळ्या लूकमधले फोटो शेअर केले आहेत.
नेहा धुपिया सध्या 'रोडीज रेव्हेल्यूशन'मध्ये टीम लीडर म्हणून दिसत आहे. या शोची ऑडिशन सुरू असून यामध्ये एका मुलानं सांगितलं की, त्याची गर्लफ्रेंड एकावेळी 5 मुलांना डेट करत होती आणि त्याच्याबरोबर रिलेशनशीपमध्ये चीट करत होती. त्यामुळे त्याने तिच्या कानााखाली वाजवली. या मुलाचं संपूर्ण बोलणं नेहाने ऐकून घेतलं खरं, पण त्यानंतर तिने त्याला खूप बोल सुनावले. 'पाच किंवा त्याहून जास्त मुलांना डेट करणं हा त्या मुलीचा स्वतःचा निर्णय असू शकतो. त्यासाठी तिच्या कानाखाली मारण्याचा तुला काहीही अधिकार नाही.' अशा शब्दात नेहानं त्या मुलाला सुनावलं. काही दिवसांपूर्वी नेहाने या घटनेबाबत तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून स्पष्टीकरण देखील दिलं होतं.  मी हिंसेविरोधात आवाज उठवला पण गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला प्रकार लक्षात घेता मला कुणी समजून न घेतल्याचही ती म्हणाली. त्याचप्रमाणे या घटनेनंतर तिला आणि तिच्या मित्रमैत्रिणींना ट्रोलिंगला सामोरं जावे लागल्याने तिने नाराजी देखील व्यक्त केली होती. तिच्या वडिलांच्या व्हाट्सअॅपवर आणि मुलीच्या फेसबुकवर शिव्यांनी भरलेले मेसेज येत असल्याने तिने राग व्यक्त केला होता. दरम्यान नेहाच्या या पोस्टला अनेकांनी पाठिंबा दिला आहे. केवळ तिचा नवराच नव्हे तर बॉलिवूडमधील अनेक बडे कलाकार तिच्या पाठिशी ठाम उभे आहेत. त्यांंनी नेहाची पोस्ट रिपोस्ट करत तिला आपला पाठिंबा दर्शवला आहे. रिचा चड्ढा, नीना कुळकर्णी, एकता कपूर यांसारख्या अनेक कलाकारांनी नेहाची बाजू घेत तिच्या वक्तव्याचं समर्थन केलं आहे.
First published:

पुढील बातम्या